Pune Crime : माजी मंत्र्यांच्या मुलाचं विमान शोधून काढणारे पोलीस आरोपीला जेरबंद करू शकत नाहीत? पुणे घटनेवरून विरोधक आक्रमक

Pune Crime News : पुणे घटनेवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात अद्याप आरोपी जेरबंद करू शकत नाहीत? असा सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
Swargate bus depot
Swargate bus depotSaam tv
Published On

मुंबई : पुणे अत्याचार प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. पुणे अत्याचार प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणानंतर विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. अत्याचाराच्या घटनेने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तानाजी सावंतांच्या मुलाचं विमान शोधून काढणारे पोलीस आरोपीला जेरबंद करू शकत नाहीत? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना सवाल केला आहे.

Swargate bus depot
Rashtrawadi Congress : राष्ट्रवादी कोणाची? आज होणार 'सुप्रीम' सुनावणी | Video

पुण्यातील स्वारगेट येथील डेपोत २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावरून काँग्रेसने पुणे पोलीस आणि एसटी प्रशासनावर टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी 'एक्स'वर पोस्ट करत टीका केली. स्वारगेट बस स्थानकातील घटना म्हणजे पुणे पोलिसांचा, एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस असल्याची टीका केली.

Swargate bus depot
Mumbai Congress Protest: मदर डेअरीच्या जागेवरून काँग्रेस आक्रमक, अदानी समूहाविरोधात कुर्ल्यात आंदोलन; पाहा VIDEO

विजय वडेट्टीवार म्हणाले, 'बस डेपोत २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अजून पोलिसांना सापडला नाही. महायुतीतील माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे विमान शोधून काढणारे पुणे पोलीस पहाटे घडलेल्या घटनेतील आरोपी अजूनही जेरबंद करू शकत नाहीत, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे'.

Swargate bus depot
Pune Traffic changes : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल, काही रस्ते बंद, काही मार्गात बदल

'राज्याचे गृहखाते महिला सुरक्षेच्या बाबतीत आणखी किती ढिसाळ कामगिरी करणार? एसटी प्रशासन जबाबदारी घेणार का? इतकं होत असताना स्वारगेट बस स्थानकात कर्मचारी काय करत होते? परिवहन मंत्री कुठे आहेत? असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर सत्ताधारी मंत्र्यांकडून काय प्रत्युत्तर दिलं जाते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com