Phule: '..फुलेंच्या अपमानावर आम्ही गप्प बसणार नाही', प्रकाश आंबेडकर आक्रमक; सेन्सॉर बोर्डाविरोधात आंदोलनाचा इशारा

Controversy Surrounds 'Phule' Biopic: “फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेनुसार महात्मा फुलेंचा अपमान आम्ही सहन करणार नाही,” असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी सेन्सॉर बोर्डाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar SAAM
Published On

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारीत 'फुले' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'फुले' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याला विरोध दर्शवला जात आहे. फुले चित्रपटातील काही दृष्यांना ब्राह्मण महासंघाकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. या विरोधामुळे ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा फुले चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच सेन्सॉर बोर्डाकडूनही या चित्रपटातील अनेक दृष्यांना कात्री लावण्यात आली आहे. या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निषेध केला आहे. तसेच सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

११ एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त 'फुले' हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, फुले चित्रपटातील काही दृष्यांवर आनंद दवे यांनी आक्षेप घेतला. ब्राह्मण महासंघांनी केलेल्या विरोधामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. यावर प्रकाश आंबेडकर यांनी निषेध व्यक्त करत आंदोनलानाचा इशारा दिला आहे. "वंचित बहुजन आघाडी फुले - शाहु - आंबेडकर विचारधारेला अनुसरून महात्मा फुलेंच्या अपमानावर गप्प बसणार नाही", असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

Prakash Ambedkar
Santosh Deshmukh Case: “भावाला सोडा, काही करू नका, २० वेळा विनंती तरी हत्या”; धनंजय देशमुखांनी सांगितला "त्या" दिवशीचा घटनाक्रम

तसेच, '११ एप्रिल रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी फक्त त्यांची जयंती साजरी करणार नाही, तर पुण्यात सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरोधात निषेध आंदोलन करणार'; असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत दिली आहे.

११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महात्मा फुले वाडा येथे हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Prakash Ambedkar
Dombivali: डोंबिवली हादरली! रिक्षाचालकाकडून गतिमंद महिलेवर अत्याचार; अज्ञातस्थळी नेलं अन्...

प्रकाश आंबेडकर यांनी ही भूमिका आक्रमकपणे मांडली असून, सेन्सॉर बोर्डाने ज्या दृश्यांवर आक्षेप घेतला आहे, ते दृश्ये ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असून, त्यांना काढून टाकणे म्हणजे सत्य दडपण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान, सेन्सॉर बोर्डाचे संबंधित पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com