Maharashtra News Live Update: भाईंदर पूर्वेत भीषण आग

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: इराण-अमेरिका युद्ध, महाराष्टातील राजकीय घडामोडी, हवामानाचे अपडेट, अवकाळी पाऊस, नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण यासह देश विदेेशातील अपडेट जाणून घ्या.
Maharashtra Live News Update :
Maharashtra Live News Update :Saam Marathi
Published On

भाईंदर पूर्वेत भीषण आग

लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात आगीचे लोड पसरले होते.

त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

आग विजवण्यासाठी पालिकेचे अग्निशमन विभाग आणि स्थानिक नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन विभागाच्या माध्यमातून आगी विजवण्याचे काम सुरू आहे

पुणे महामेट्रो फेज टू चा प्रवास सुरू अंतिम टप्प्यात

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बेस्टच्या जादा बस गाड्या

* 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहर आणि उपनगरतील विविध अधिकार छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दादर येथील चैत्यभूमीला भेट देण्यासाठी बेस्टच्या विशेष गाड्या

* मंगळवार १४ एप्रिल 2026 मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत बेस्टच्या गाड्यांचे विशेष सोय

टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडचे २०२५–२६ आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर

देशातील चौथ्या क्रमांकाची बहुराज्जीय सहकारी बँक असलेल्या टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडने दिनांक  ३१ मार्च २०२६ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठी आपले लेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मागील १५ वर्षांप्रमाणे यंदाही दिनांक १० एप्रिल रोजी लेखा परिक्षित निकाल जाहीर करण्याची परंपरा बँकेने कायम ठेवली आहे.

पालघर- मुंबई अहमदाबाद महामार्गावर कॉइल घेऊन जाणारा ट्रक पलटी

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील घटना. अपघातामध्ये चालक किरकोळ जखमी. चालकाचे वेगा वरील नियंत्रण सुटल्याने चारोटी उड्डाणपुलावर ट्रक पलटी. घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल. मुंबई वाहिनीवर लांबच लांब रांगा. पलटी झालेला ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचं काम सुरू.

नाशिक IT कंपनी लैंगिक शोषण प्रकरण; HR मॅनेजरची SITकडून चौकशी

नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणात तपासाला वेग आला आहे. कंपनीची HR आणि ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानी यांना क्राईम ब्रँच युनिट १ येथे चौकशीसाठी आणण्यात आले आहे. विशेष तपास पथक (SIT) त्यांच्या चौकशी करत असून प्रकरणातील विविध बाबींचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे IT क्षेत्रात खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नारायण राणेंच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेते सिंधुदुर्गात

सिंधुदुर्गात आज राजकीय नेत्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, सुनील तटकरे, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे चिपी विमानतळावर दाखल झाले. पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी त्यांचे स्वागत केले. हे सर्व नेते कणकवली येथे खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

बारामती सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो

बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पोट निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार उमेदवार असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी होत असून या प्रचार शुभारंभाच्या बॅनर वरती शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे

बदलापूर नगरपालिकेत ठेकेदारांचे कामबंद आंदोलन; विकासकामे ठप्प

बदलापूर नगरपालिकेतील ठेकेदारांनी बिलं न मिळाल्यामुळे कामबंद आंदोलन सुरू केले असून शहरातील विकासकामे ठप्प झाली आहेत. मार्चअखेरपर्यंत देय असलेली बिलं एप्रिलमध्येही न मिळाल्याने ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. निधीअभावी नवीन कामे सुरू करणे अशक्य झाल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने बिलं अदा करावीत, अन्यथा उपासमारीची वेळ येईल, असा इशारा ठेकेदारांनी दिला.

पावसामुळे धान्य सडले; 48.86 कोटींचा तोटा, चौकशीची मागणी

पावसामुळे सुमारे 2 लाख 10 हजार क्विंटल धान्य सडून तब्बल 48 कोटी 86 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 2024-25 साठी खरेदी केलेले धान योग्य साठवणुकीअभावी खराब झाले. प्रशासनाने धान्य उचल न केल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. उर्वरित साठाही सडण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांनी यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी होत आहे.

जळगाव नेहरू नगरातील सांदीपनी बॉईज हॉस्टेलमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली

जळगाव शहरातील नेहरू नगर परिसरातील सांदीपनी बॉईज हॉस्टेल येथे आज शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. ही आग हॉस्टेलच्या प्रवेशद्वाराजवळ लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

विवाहबाह्य प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या ६ वर्षांच्या चिमुरड्याची आईकडूनच हत्या

विवाहबाह्य प्रेम संबंधात अडथळा ठरू शकतो म्हणून पोटच्या ६ वर्षांच्या मुलाचा आईने जीव घेतला आहे. प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील महाळुंगे दक्षिण पोलीस स्टेशन हद्दीत घडली.

बुलढाणा नगरपालिकेचा कर आकारणी सर्वेक्षणाला प्रारंभ

दर चार वर्षांनी चतुर्थी वार्षिक कर आकारणी केली जाते, मात्र बुलढाणा नगर परिषदेत अंतर्गत 2001 पासून ही कर आकारणी प्रलंबित होती, केवळ पुरवणी यादीनुसार कर आकारला जात होता, परंतु आता नगरपालिकेकडून प्राधान्याने कर आकारणीसाठी सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे.

धुळ्यात शिरपूर टोल कर्मचाऱ्यांचे टोल प्रशासनाच्या विरोधात आंदोलन

धुळ्यातील शिरपूर टोलनाका येथे टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मनमानी कारभार करणाऱ्या टोल प्रशासनाचा विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे, गेल्या साडे तीन वर्षांपासून पगार वेळेत दिले जात नाहीत, त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या सणासुदींना देखील सुट्टी मिळत नसल्याचं म्हणत ढोल प्रशासनाच्या या कार्यप्रणाली विरोधामध्ये सर्व टोल कर्मचारी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे

वाशिम समृद्धी महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात; दोन गंभीर जखमी

  • समृद्धी महामार्गावर रुग्णवाहिकेने चालत्या आयशर ट्रकला धडक देत अपघात झालाय

  • डुलकी आल्यामुळे चालत्या आयशर ट्रकला रुग्णवाहिकेने धडक देत अपघात झालाय

  • या अपघातात रुग्णवाहिकेतील दोन जण गंभीर तर एक जन किरकोळ जखमी झाले आहेत.

  • वाशिम च्या कारंजा तालुक्यातील दोनद परिसरातील नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक 176 अपघात झालाय

वाई तालुक्यातील सुरूर गावच्या भैरवनाथ बगाड यात्रेला भाविकांची मोठी गर्दी; अनेक वर्षापासूनची परंपरा

  • सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असणाऱ्या सुरूर गावातील भैरवनाथाची बगाड यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली

  • गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या बगाड यात्रेसाठी दरवर्षी हनुमान जयंतीला बगाडाचा कौल लावला जातो ज्यांचा कौल येतो त्यांना बगाड्या होण्याचा मान मिळतो

  • यावर्षी अतुल उदयसिंग चव्हाण यांना बगाडाचा मान मिळाला

भिवंडी नगरसेवक व पालिका अधिकारी यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर पालिकेकडून बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाई

भिवंडी पालिका मुख्यालयात गुरुवारी बाजारपेठेतील मच्छी मटण मार्केट इमारत परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली जात नसल्याचा ठपका ठेवत नगरसेवक फराज ( बाबा ) बाहुद्दीन व प्रभाग समिती क्रमांक पाचचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सईद चिवणे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती.

त्यावेळी फराज बाहुद्दीन यांनी भ्रष्टाचार करून कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर प्रभारी सहाय्यक आयुक्त सईद चिवणे त्यांचे बिट निरीक्षक हनुमान म्हात्रे यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा या मार्केट इमारती बाहेरील सर्व दुकानांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करीत येथील रस्ता मोकळा केला आहे

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने 31 ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश- राधाकृष्ण विखे पाटील

  • पाणी कपात लागू करण्याचा निर्णय महापालिकांना घ्यायचा आहे

  • पुणे महापालिकेने थकीत पाणीपट्टी न भरल्यास पाणीपुरवठा बंद करणार, राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा,

  • पाणीपुरवठा बंद करण्यासंदर्भात पाटबंधारे विभागाशी केली चर्चा

  • ऑपरेशन टायगर संदर्भात मला काही माहिती नाही

  • राहुरीतील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात आम्हाला यश आलं नसले तरीदेखील राहुरीत महायुतीचा उमेदवार निवडून येणार

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ

Summary
  • सोन्याच्या दरात 1 हजार रूपयांनी तर चांदीचा दरात 5 हजार रुपयांची वाढ

  • सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार 15 रुपयांवर

  • चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर

  • युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर सोन्या चांदीच्या दरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून चढ उतार सुरू आहे

nagpur : नागपुरात जोडप्याकडून रेल्वे पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न 

- पुलावर चढून खाली उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणीला तरुणांनी वाचवले. नागपूर शहरातील अजनी रेल्वे पुलावरची ही घटना असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

lonavala : लोणावळ्यात अतिक्रमण हटवल्याच्या विरोधात व्यापाऱ्यांचे उपोषण

लोणावळ्यातील भुशी धरण परिसरातील अतिक्रमण काल हटवले.150 छोट्या व्यवसायिकांवर उपासमारीचे संकट.. कारवाईच्या विरोधात व्यापाऱ्यांचे उपोषण..

pune : मुठा नदी पात्रात आढळला जवळपास ६ वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या मुठा नदी पात्रात आज दुपारी जवळपास सहा वर्षांच्या एका चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आहे. खडकी आणि दापोडी दरम्यान वाहणाऱ्या मुठा नदी पात्रात हॅरिस ब्रिजजवळ अनोळखी चिमुकल्या मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे.

pune : उसाच्या शेतात अफूची बेकायदेशीर शेती उघड; २.६० लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

पुण्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर येथील थिटेमळा परिसरात उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून बेकायदेशीर अफूची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत सुमारे २ लाख ६० हजार रुपये किमतीची अफूची २३० झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी शेतमालक काळूराम दशरथ थिटे याला अटक करण्यात आली आहे.केंदूर येथील थिटेमळा परिसरात छापा टाकला. उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून अफूची झाडे लावण्यात आल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी तब्बल २३० अफूची झाडे जप्त करत अंदाजे २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.या प्रकरणी शेतमालक काळूराम दशरथ थिटे (वय ६६, रा. जांभळावस्ती, केंदूर) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

kolhapur : कंत्राटदारांचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या

कोल्हापुरात कंत्राटदारांचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या केला.

थकीत बिलाच्या वसुलीसाठी कोल्हापुरातील कंत्राटदार आक्रमक

आमच्या बिलांची वसुली झाल्याशिवाय नवीन निविदा काढू नका, कोल्हापूरमधील कंत्राटदारांची मागणी

मागणीसाठी कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात मारला ठिय्या

Farmer news : शेतकऱ्यांचे १०१२ कोटींचे एफआरपी साखर कारखान्याकडे थकीत

राज्यात शेतकऱ्यांचे 1012 कोटी एफआरपी साखर कारखान्याकडे थकीत

राज्यातील 29 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची नोटीस

शेतकऱ्यांना एफ आर पी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या 29 साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे

या साखर कारखान्याचे 13 एप्रिल रोजी साखर आयुक्त सुनावणी होणार आहे

Nashik News : लष्करी सामग्री वाहन घेऊन जाणाऱ्या ट्रकला लागली आग

नाशिकच्या येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्याजवळ लष्कराची सामुग्री घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. लष्कराची सामुग्री घेऊन येणारा ट्रक पोलिसानी थांबवला असता, तो रस्त्याच्या कडेला थांबवल्यानंतर ट्रक चालकाकडून पोलिसांनी पैशांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने पोलीस आणि ट्रक चालक यांच्यात बाचाबाची झाल. त्यातून सिगारेट ओढणाऱ्या पोलिसाने ट्रकला आग लावल्याचा आरोप ट्रक चालकाने केला. दरम्यान ट्रकला आग लागल्याने येवला नगरपरिषद अग्निशामक दल पोचताच त्यांनी आग विझविली.

Thane Fire : ठाण्यातील एक दुचाकी अचानक पेटली  

ठाण्यातील गांधीनगर या ठिकाणी दुपारच्या सुमारास एका दुचाकीला अचानक आग लागली. सदरच्या घटनेत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. अग्नीशमनदल घटनास्थळी पोहोचले आहे.

Kolhapur : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील भूसंपादन सर्व्हेला सुरुवात

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्या अंतर्गत सध्या मंदिर परिसरातील विविध विकास कामांना प्रारंभ झालेला आहे. मंदिराच्या बाहेरील चार ही दरवाजा जवळ असणाऱ्या अनेक मिळकतींचा सर्व्हे सध्या राज्य शासनाच्या वतीने करण्यास सुरुवात झालेली आहे. मूळ मंदिरापासून दहा मीटर अंतरावरील असणाऱ्या साधारण 250 हून अधिक मिळकती आणि त्याचा अहवाल सध्या राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे.

मालवणात एलईडी मासेमारीविरोधात मच्छीमारांचा संताप; मत्स्य विभागावर धडक मोर्चा

सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या अनाधिकृत एलईडी मासेमारीच्या विरोधात मालवणात पारंपारिक मच्छीमार रस्त्यावर उतरले आहेत. ठाकरे शिवसेनेतर्फे मालवण मत्स्य विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला असून मालवण, वेंगुर्ला, देवगड या भागातील स्थानिक मच्छीमार बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत.

कोपरगावामध्ये चोरट्याने वाईन शॉपमधून महागड्या दारूच्या बाटल्या केल्या लंपास , घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

कोपरगाव शहरातील 'मधु वाईन्स' आणि 'जिओ मार्ट' मोबाईल दुकान चोरट्यांनी फोडले आहे.. मधु वाईन्स या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एका चोरट्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत.. तेथून चोरट्याने गल्ल्यातील रोख रक्कम आणि महागड्या दारूच्या काही बाटल्या असा अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केलाय.

नाशिकच्या IT कंपनीसमोर भाजपचं आंदोलन

भाजप युवा मोर्चाकडून IT कंपनीसमोर आंदोलन करण्यात आलं आहे. नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण झालं आहे.

रायगड शिवसेना ठाकरे गटात संघटनात्मक फेरबदल

रायगड जिल्हा शिवसेना ठाकरे गटात फेरबदल करण्यात आले आहेत. संजय मानाजी कदम यांची दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली आहे. महाड आणि श्रीवर्धन या दोन मतदार संघांची जबाबदारी त्यांच्यावर राहील.

पाषाण तलावात मृत मासे, तलावाची झाली बिकट अवस्था

पाषाण तलावात मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगत असल्याने पाषाण तलावाची गंभीर समस्या निर्माण झालीय. स्थानिकांनी महापालिकेवर निष्काळजीपणाचा असल्याचाच तक्रारी नागरिक करत आहेत तलाव आधीच जलपर्ण पूर्णपणे झाकलेला होता आणि आता त्याची अवस्था बिकट झालीय.

सिंधुदुर्गात अजूनही व्यावसायिक गॅसचा तुटवडा; हॉटेल व्यावसायिक मेटाकुटीस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा कायम असून यामुळे हॉटेल चालकांना चूल पेटवून खाद्यपदार्थ बनवावे लागत आहेत. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे बुकिंग होत नाही.

Nagpur: आपली बसच्या तीन ऑपरेटर विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करणार 

आपली बसच्या तीन ऑपरेटर विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करणार, महानगर पालिकेच्या परिवहन समितीच्या बैठकीत निर्णय

नागपूर महानगरपालिकेला 237 बसेस मिळाल्या होत्या,या बसेसच्या संचालनासाठी 3 ऑपरेटर्स ची नेमणूक करण्यात आली

यापैकी 123 बसेसना पंधरा वर्षे पूर्ण झाल्यामुळे रस्त्यावरून बाद करण्यात आल्या

या जुन्या झालेल्या बसेसचे चेसिस आणि सुटे भाग गहाळ झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले

संबंधित ऑपरेटर्सना नोटीस देऊनही त्यांच्याकडून उत्तर न दिल्याने गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत

तसेच तिन्ही ऑपरेटर्स कडून 32 लाख 39 हजार रुपयांची वसुलीचाही निर्णय परिवहन समितीने घेतला आहे

Narayan Rane: माजी केंद्रीय मंत्री व भाजप खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

माजी केंद्रीय मंत्री व भाजप खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांची खास कलाकृती

जुहू चौपाटीवर समुद्राच्या वाळूपासून राणे यांचे आकर्षक शिल्प साकार

शिल्प पाहण्यासाठी नागरिक व पर्यटकांची गर्दी

लक्ष्मी गौड यांच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक

वाढदिवसानिमित्त राणे समर्थकांकडून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन

Nandurbar: नंदुरबारचे पालकमंत्री होऊन २५ दिवस झाले, तरी हसन मुश्रीफांनी जिल्ह्याचा दौरा केला नाही

नंदुरबार जिल्ह्याला पालकमंत्री पद नियुक्ती होऊन 25 दिवस उलटले तरी देखील नंदुरबार जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री हसन मुश्रीफ नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले नाहीत . पालकमंत्री जिल्ह्यात आलेले नसल्यामुळे जिल्हा विकासाला कधी चालना मिळणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सदनिका प्रकरणात कारवाई झाल्यामुळे त्यांनी मंत्री पदाच्या राजीनामा दिला होता, त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद दोन महिने रिक्त झाला होता, दोन महिन्यानंतर हसन मुश्रीफ यांची पालकमंत्री पदी निवड करण्यात आलेली आहे. मात्र हसन मुश्रीफ यांची निवड होऊन आज 25 दिवस उलटले तरी देखील हा हसन मुश्रीफ जिल्ह्यात आलेले नाही आहे. आता मुश्रीफ यांना नंदुरबार जिल्ह्यात येण्यासाठी कधी मुहूर्त मिळणार आणि विकासाला कधी चालणार मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.

मिरा रोड स्मशानभूमीत कामकरणाऱ्या कामगारांना दोन महिन्यांपासून पगार नाही, चक्क 'तिरडीवर' झोपून केले आंदोलन

मिरा रोड स्मशानभूमीत कामकरणाऱ्या कामगारांना दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने चक्क 'तिरडीवर' झोपून केले आंदोलन

श्रमजीवी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली 'नवशा रूपा बाबर मुक्ती धाम' येथे हे अनोखे आणि संतापजनक आंदोलन करण्यात आले."

मृतांना सन्मानाने निरोप देणाऱ्या हातांवर आज स्वतःच्या पोटासाठी 'तिरडी' धरण्याची वेळ आली आहे.

दोन महिने उलटूनही पालिकेने पगार न दिल्याने कामगारांचा संयम सुटला.सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली

जोपर्यंत थकीत वेतन मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.

'मुक्ती धाम'च्या प्रवेशद्वारावरच तिरडी मांडून कामगारांनी प्रशासकीय दिरंगाईचा निषेध केला.

Nashik: महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून 9 लोकांची केली 13 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक

चौकशी दरम्यान रवींद्र एरंडेच्या घरातूनच पोलिसांनी जप्त केले बनावट नियुक्तीपत्र

रवींद्र एरंडे याने निम्मी रक्कम रोख स्वरूपात स्वीकारल्याची माहिती

Amravati: अमरावतीत आयपीएल सामन्यावर सट्टा; एका तरुणास अटक...

अमरावतीत आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळविणाऱ्या एकावर शहर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे .... अमरावती शहरात राहणाऱ्या गिरीश दादलानी याला पोलिसांनी अटक केली आहे .. दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्यावर फोनच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा हा तरुण खेळवत होता याची माहिती पोलिसांना लागतात त्याला पोलिसांनी अटक केली आहे... त्याच्याकडून 40 हजाराचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला... अवैध पद्धतीने कुठली टीम विजय होते आणि पराजय होते आणि प्रत्येक बॉलवर ऑनलाईन सट्टा हा तरुण खेळवत होता या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली

राज्यातील 27 गॅस वितरकांचे एचपीसीएल ने केले परवाने रद्द

राज्यातील 27 गॅस वितरकांचे एचपीसीएल ने केले परवाने रद्द

नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिल्याने कारवाई

युद्ध परिस्थितीमुळे गॅस टंचाई काळात नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या वितरकाचे परवाने रद्द

14 मार्च ते सात एप्रिल दरम्यान 4385 ठिकाणी तपासणी करण्यात आली आणि 74 वितरका विरुद्ध कारवाई केली

एचपीसीएल ने प्रशासनाच्या मदतीने 357 ठिकाणी छापी टाकली आणि 40 गुन्हे दाखल केले

3163 एलपीजी सिलेंडर राज्यभरामध्ये या कारवाईत जप्त करण्यात आले आहेत

Nashik: भोंदू अशोक खरात प्रकरणी महत्त्वाची अपडेट

भोंदू अशोक खरात प्रकरणी महत्त्वाची अपडेट

तब्बल 160 GB डिजिटल पुरावे उघड, खरातच्या कारनाम्यांचा काळा चेहरा समोर

फॉरेन्सिक अहवाल SIT कडे सादर, तपासाला वेग

एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण, पुराव्यांमुळे खरातभोवतीचा फास अधिक घट्ट

प्रत्येक पुराव्याला A, B, C कोडवर्ड, ‘A’ मध्ये लैंगिक अत्याचाराचे गंभीर संकेत

नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 कालावधीतील हालचालींचा तपशील, कॅनडा कॉर्नर कार्यालयातून जप्त

32 GB + 16 फोल्डर डेटा, 2 पेन ड्राईव्ह + 64GB OTG डिव्हाइस आणि लॅपटॉपसह सर्व डेटा SIT कडून स्कॅन

Pune: पुण्यात अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम

पुण्यात अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम

शहरातील छत्रपती संभाजी उद्यान येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला

या मोहिमेत पुणे पोलिस आणि महाविद्यालयीन तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता

तरुण वर्गाने नशेपासून दूर रहावे असे आवाहन पोलिस उपआयुक्त कृषीकेश रावले यांनी केले

अमली पदार्थाचा लढा हा एकट्याची जबाबदारी नसून तो सर्वांनी दिला पाहिजे असे आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आले

समाजातील तरुणाना व्यसनमुक्त करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची ग्वाही यावेळी पोलिसांनी दिली

विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यांच्या माध्यमातून अमली पदार्थांविरोधात जनजागृती केली

या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका आणि प्राचार्या प्रा. डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांनी केले होते

Pune: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रॉकेल विक्रीला परवानगी, 62 रुपये प्रति लिटरने मिळणार

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रॉकेल विक्रीला परवानगी 62 रुपये प्रति लिटरने रॉकेल मिळणार

ग्रामीण भागातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना रॉकेल देण्याच्या सूचना शहरी भाग वगळला

गॅस तुटवडा राज्य सरकारने रॉकेल देण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी पुणे जिल्ह्याला दोन लाख चार हजार लिटरचा पुरवठा करण्यात आला आहे

मात्र रॉकेल चे भाव आणि कोण विक्री करायचे याची राज्य सरकारने आदेश दिले नव्हते तीन घाऊक विक्रेत्याच्या आता रॉकेल वाटपासाठी नेमणूक करण्यात आली आहे

Pune: पुणेकरांच्या पाण्यात एका थेंबाचीही कपात होणार नाही, पुणे महापालिकेची भूमिका

पुणेकरांच्या पाण्यात एका थेंबाचीही कपात होणार नाही, पुणे महापालिकेची भूमिका

जलसंपदा विभागाने किती ही पत्र पाठवले तरी पाणी कपात होणार नाही

पुणेकर कोणत्याही प्रकारे पाण्याचा अपव्यय करत नाही नाही

त्यामुळे पाणीकपात लागू केली जाणार नाही अशी भूमिका स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी घेतली आहे

पुण्यात १५ टक्के पाणीकपात लागू करण्यासाठी जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला पत्र पाठवले आहे

मात्र आता पुण्याच्या पाणी कपाती वरून महापालिका विरुद्ध जलसंपदा विभाग आमने सामने आले आहेत

Raigad: किल्ले रायगडाला लागला वणवा

स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला असलेल्या किल्ले रायगडाला काल वणवा लागला. रायगडाच्या पाश्चिम भागात म्हणजे हिरकणी वाडी वाडी परिसरात हा वणवा लागला आणि वणव्याची हि आग हिरकणी वाडी पासून ते महादरवाजा परिसरा पर्यंत पसरली होती. यामुळे किल्ल्यावरील विज पुरवठा आणि पाणी पुरवठा प्रभावीत झाला आहे. वणवा विझविण्यासाठी येथील स्थानिक आणि व्यवसायीकांनी शर्तीचे प्रयत्न केले. सुदैवाने या वणव्यामुळे कोणत्याही ऐतिहासिक वास्तुचे नुकसान झाले नाही. या वर्षी रायगड किल्ल्याला लागलेला हा दूसरा वणवा आहे. या पूर्वी मा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाघोली खिंड, भवानी टोक परिसरात वणवा लागला होता. किल्ले रायगडाला वणवा लागण्याच्या या वाढत्या घटनांमुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त होत आहे.

Pune: पुण्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील घेणार महत्वाची बैठक

पुण्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील घेणार महत्वाची बैठक

जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाची बैठक होणार

सकाळी १० वाजता सिंचन भवन येथे बैठक होणार असून या बैठकीला सर्व अधिकारी उपस्थित राहणार

विखे पाटील पुणे जिल्ह्यातील आणि एकूण राज्यातील पाण्याचा आढावा येणार आहेत

दुसरीकडे पुण्यात पाणी कपात लागू करण्यासंदर्भात ही चर्चा होणार आहे

Raigad: रायगड रोप वेमध्ये बचावाचे प्रात्याक्षिक

स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड येथे पर्यटक आणि शिवप्रेमींना रायगड रोप वे विना अपघात 30 वर्षे सेवा देत आहे. अपघात घडू नये यासाठी दक्षता घेण्यात येत असली तरी एखादी दुर्घटना घडली तर बचावकार्य कसे होइल याचे प्रात्याक्षिक NDRF च्या जवानांनी दाखवले. रायगड रोप वेच्या लोअर स्टेशन जवळ NDRF च्या जवानांनी हे बचावाचे प्रात्याक्षिक सादर केले. रोप वे मध्येच बंद झालातर रोप वेच्या केबिनमध्ये बसलेल्या शिवप्रेमींना कशा प्रकारे सुरक्षित खाली उतरवण्यात येणार याचे हे प्रात्यक्षिक होते.

Yavatmal: यवतमाळात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी युवा संवाद

यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दहावी-बारावी नंतर काय करावं प्रशासकीय सेवेसोबत विविध प्रकारच्या संधी कशा उपलब्ध आहेत परीक्षेसाठी नेमकी तयारी कशी करावी यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यासाठी पुढाकार घेतला असून 21 एप्रिल पासून दर सोमवारी बचत भवन यवतमाळ येथे युवा संवाद हा विशेष मार्गदर्शन कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढीव, हायकोर्टच्या नागपूर खंडपीठाकडून दखल

- बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढीव, हायकोर्टच्या नागपूर खंडपीठाकडून दखल, कारणे शोधण्यासाठी विशेष समिती स्थापन

- अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, १५ दिवसांत बैठक घेण्याचे आदेश

- पाण्याची वाढ का होतेय? कारणे शोधून उपाययोजना सुचवण्याचे निर्देश...

- बुलढाणा जिल्हाधिकारी, नगर परिषद, VNIT प्रतिनिधींचा समावेश,।तज्ज्ञ व न्यायालयमित्र समितीत सहभागी...

- जगप्रसिद्ध मेटिओराइट क्रेटर म्हणून लोणार सरोवर ओळख, आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनासाठी महत्त्व

- चार जलस्रोतांमुळे पातळी सातत्याने वाढतेय, गेल्या काही महिन्यांपासून परिस्थिती गंभीर

- मंदिरं पाण्याखाली जाण्याची स्थिती, दीपमाळ अर्धी बुडाल्याने चिंता वाढली....

- जैवविविधतेवर धोका, परिसंस्थेचे अस्तित्व संकटात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com