Maharashtra Politics: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? मविआ फुटली?
2019 मध्ये राज्यात सत्तास्थापनेसाठी निर्माण झालेल्या महाविकास आघाडीत उभी फूट पडण्याची चर्चा रंगलीय.. आणि त्याला कारण ठरलंय... ते म्हणजे काँग्रेसनं सुरु केलेल्या स्वबळाच्या हालचाली... दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असल्यानं आता काँग्रेस थेट महाविकास आघाडीतून बाहेर पडून एकला चलोचा नारा देणार असल्याची माहिती समोर आलीय.आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याला अप्रत्यक्षपणे दुजोराही दिलाय..
खरंतर 2019 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र येत सत्तेसाठी महाविकास आघाडीची स्थापना केली...अडीच वर्षानंतर शिवसेनेतील फुटीनंतर महाविकास आघाडीची सत्ता गेली... पुढं लोकसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीला कौल दिला.पण पुढच्याच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला.. विधानसभा निवडणुकीपासून सुरु झालेली महाविकास आघाडीतील काँग्रेसची घसरण थांबण्याचं नाव घेत नाही... मात्र काँग्रेसची घसरण कशा पद्धतीने सुरु आहे..
विधानसभा निवडणूक - 17 आमदार विजयी
नगरपालिका निवडणूक 288 पैकी केवळ 28 नगराध्यक्षपद राखण्यात यश
महापालिका निवडणूक - 29 पैकी 4 महापालिका जिंकण्यात यश
जिल्हापरिषद - 12 पैकी एकही परिषद जिंकता आलेली नाही
आधीच पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यानं काँग्रेसला स्वबळावर लढावं लागलं... त्यात आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर पवार सत्तेत सहभागी झाले तर काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यताच जास्त आहे... त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असतानाच काँग्रेसनं आपलं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी एकला चलो च्या हालचाली सुरु केल्या आहेत...आता हे बघणं महत्वाचं असेल की स्वबळाच्या या हालचालींमुळे येणाऱ्या काळातील 21 जिल्हा परिषद निवडणुकीत कॉग्रेसचा घसरण सुरूच राहणार की काँग्रेस मुसंडी मारणार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
