Weather Update : राज्यात हवामानाची दोन टोक! कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा, तर विदर्भ उष्णतेनं होरपळला

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात हवामानाचे दोन टोक अनुभवायला मिळत असून विदर्भात तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
MAHARASHTRA WEATHER ALERT HEATWAVE IN VIDARBHA RAIN FORECAST ACROSS STATE
MAHARASHTRA WEATHER ALERT HEATWAVE IN VIDARBHA RAIN FORECAST ACROSS STATEAI
Published On
Summary
  • विदर्भात ४६°C पेक्षा जास्त तापमान, रेड अलर्ट जारी

  • मुंबई-ठाण्यात उकाड्याचा त्रास वाढला

  • कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता

  • मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता

राज्यात हवामानाची दोन टोक पाहायला मिळत आहे. एकीकडे विदर्भ वाढत्या उष्णतेने होरपळला असून दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज विदर्भातील ४, मराठवाड्यातील २ जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबईसह, पालघर आणि ठाण्यात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान या दुहेरी टोक गाठलेल्या हवामानाने नागरिकांची मात्र त्रेधा तिरपीट उडाली आहे. पुढील काही तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असून काही दिवसांमध्ये तो महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यामुळे उकाड्याने लाही लाही झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल.

आज विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे तापमानाने ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून नागपूरमध्ये ४६.५° तर भंडारा आणि गडचिरोली येथे ४६.४° तापमानाची नोंद झाली आहे. अकोला आणि नागपूर जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उष्ण लाटेचा प्रभाव कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ब्रह्मपुरी हे शहर देशातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक ठरले असून जागतिक स्तरावरही त्याची नोंद झाली आहे.

MAHARASHTRA WEATHER ALERT HEATWAVE IN VIDARBHA RAIN FORECAST ACROSS STATE
Chia Seeds : वजन कमी करण्यासाठी पाण्यातून सब्जा पिता? थांबा, आधी जाणून घ्या पिण्याची योग्य पद्धत

दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात उष्ण व दमट हवामानाचा त्रास जाणवत आहे. वाढलेल्या आर्द्रतेमुळे नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. तर यवतमाळ, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर; तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

MAHARASHTRA WEATHER ALERT HEATWAVE IN VIDARBHA RAIN FORECAST ACROSS STATE
School Reopen : १५ नाही तर २६ जून, शाळा सुरू होण्याची तारीख का बदलली जाणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मान्सूनची वाटचालही वेगाने सुरू असून पुढील काही तासांत तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्रात आगमन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची आशा आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com