Maharashtra Weather: महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरला! तापमानात चढ-उतार होणार, अनेक ठिकाणी धुक्याची चादर

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होताना दिसत आहे. राज्यात हळूहळू तापमानात वाढ होत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी किमान तापमानाची नोंदण १० अंशाच्या वर झालेली आहे.
Maharashtra Weather
Maharashtra WeatherSaam Tv
Published On

राज्यात थंडी हळूहळू ओसरताना दिसत आहे. डिसेंबर महिन्यात खूप प्रमाणात थंडी होती. रविवारी राज्याचे निचांकी तापमान हे ९ अंश सेल्सियस नोंदवले गेले होते. आजही तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. आज राज्यात ढगाळ हवामानदेखील असू शकते. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather
Metro 3 News: नवीन वर्षात मुंबईकरांना मिळणार खास गिफ्ट; मेट्रो ३ च्या ६ स्थानकांचं काम होणार पूर्ण, वाचा सविस्तर

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र आहे. त्यामुळे उद्यापर्यंत हे वारे उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत आहे. पंजाबमध्ये देशातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. पंजाबच्या लुधियाना येथे ५.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राज्यातदेखील तापमान वाढले आहे. धुळ्यात फक्त १० अंश सेल्सियपेक्षा कमी तापमान आहे. बाकी सर्व राज्यांमध्ये किमान तापमान १० अंशाच्या वर आहे. आज सकाळी राज्यात थंडीसोबत अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे. (Maharashtra Weather Update Today)

राज्यातील तापमान (Maharashtra Weather)

राज्यात आज थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पुण्यात किमान तापमान १५.२ अंश आहे. तर कमाल तापमान ३१.४ अंश आहे. अहिल्यानगरमध्ये ३० अंश तापमान आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान २९.३ अंश आहे तर किमान तापमान १४.०० अंश आहे. निफाडमध्ये कमाल तापमान २७.७ टक्के आहे. तर किमान तापमान ११.६ टक्के आहे.

Maharashtra Weather
Pune Accident: पुण्यात मध्यरात्री थरार! भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

धुळ्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात किमान तापमान ९ अंश आहे तर कमाल तापमान २९.५ अंश आहे.महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १४.२ टक्के आहे तर कमाल तापमान २४.६ टक्के आहे. सांगलीमध्ये किमान तापमान १६.९ अंश आहे. कमाल तापमान २९.७ टक्के आहे.रत्नागिरीत कमाल तापमान ३० टक्के आहे तर किमान तापमान १९.७ टक्के आहे.

Maharashtra Weather
Raj Thackery and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र? दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाहा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com