Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग;'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

Latest Rain Update: राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आज कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊ या.
 हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather UpdateSaam Tv

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

राज्यात आता पुन्हा पावसाचा जोर वाढल्याचं चित्र आहे. अनेक जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईत आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावल्याचं दिसत आहे. पावसाने दडी मारल्याने राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं. परंतु पुन्हा पावसाला सुरूवात झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, सातारा,सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोकण, विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज (Maharashtra Weather Update) आहे. काल देखील काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. नाशिकमधील हरसूल येथे ७७ आणि रत्नागिरीत खेडमध्ये ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. तिकडे अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. विदर्भात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावलीय. मात्र, अजून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

नागरिकांनी आवश्यकता असेल, तेव्हाच घराबाहेर बाहेर पडावं. शेतकऱ्यांनी देखील पेरणी करण्यापूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, असं आवाहन देखील सरकारने केलं (Monsoon Alert) आहे. विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे. जोरदार वारे वाहण्याची देखील शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.

 हवामान विभागाचा अंदाज
Rain Update: धुव्वाधार पाऊस! सायंकाळीच आकाशात दाटला काळोख; सोसाट्याचा वारा अन् विजांचा कडकडाट VIDEO

पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सर्वत्र पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली (Latest Rain Update) आहे. विजांच्या कडकडाटासह पालघरच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागात पावसाची जोरदार बॅटिंग झाली. पुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवविला आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडा, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं (Weather Update) आहे. भात पेरणीच्या कामांना वेग आल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) अडखळलेली वाटचाल सुरू होण्यास पोषक हवामान होत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत.कोकणातील जिल्हे आणि पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

 हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Rain News : महाराष्ट्रात आज अन् उद्या कुठे-कुठे पडणार पाऊस? वाचा हवामान खात्याचा अंदाज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com