Weather Update: राज्यात पुन्हा धुवाँधार पाऊस; हवामान विभागाचा २३ जिल्ह्यांना अलर्ट

Heavy Rain Alert in Maharashtra: आयएमडीने महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये, ज्यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण मध्य प्रदेशांचा समावेश आहे, मुसळधार पावसाचा इशारा जारी केलाय. मुंबई आणि कोकणात ढगाळ आकाश आणि हलक्या सरी होतील अशी शक्यता आहे.
Heavy Rain Alert in Maharashtra:
IMD issues heavy rain alert for 23 districts in Maharashtra; cloudy skies in Konkan and Mumbai saamtv
Published On
Summary
  • महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट.

  • मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार.

  • मुंबई-कोकणात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता.

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस होईल अशा अंदाज वर्तवलाय. तर कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल. (Maharashtra Weather Update: Imd Heavy Rain Alert For 23 Districts)

Heavy Rain Alert in Maharashtra:
Lightning Strike : भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; वीज पडून एकाचा मृत्यू

नेहमी मुंबई आणि कोकणात धो-धो बरसणाऱ्या पावसाने आता या भागात काहीशी विश्रांती घेतलीय. येथील वातावरण ढगाळ राहणार असून येथील तापमान वाढणार आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. दुसरीकडे कोकणातील जिल्ह्यांमध्येही ढगाळ आकाश असेल, पण काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.

Heavy Rain Alert in Maharashtra:
Solapur Hotgi Lake Drone Visuals : सोलापुरात मुसळधार पाऊस; होटगी तलावाची ड्रोन दृश्य|VIDEO

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मात्र जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. यात पुणे, सातारा, सांगली,सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सोलापूरमधील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगरलाही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उर्वरित धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामधील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे.

दुसरीकडे मरावाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. तर धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. जालना आणि छत्रपती संभाजी नगरमधील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज आहे.

तर संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 12 सप्टेंबर रोजी वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com