Rain Alert: आज वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, २३ जिल्ह्यांना अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather Update: राज्यासाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. आज वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे हवामान खात्याकडून आवाहन करण्यात आले.
Rain Alert: आजही वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, २३ जिल्ह्यांना अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
MAHARASHTRA WEATHER UPDATE: IMD ISSUES THUNDERSTORM AND RAIN ALERT ACROSS SEVERAL DISTRICTSSaam Tv
Published On

राज्यात आजही पाऊस धुमाकूळ घालणार

महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडताना दिसत आहे. अशातच आता हवामान खात्याकडून आज वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील २३ जिल्ह्यांना पावासाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊसांचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकाडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, पुणे घाटमाथा आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर, चंद्रपूर, गोदिंया, वाशिम, नागपूर, वर्धा, अकोला, लातूर, अमरावती, धाराशिव, गडचिरोली, बुलडाणा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये देखील आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याकडून या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Rain Alert: आजही वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, २३ जिल्ह्यांना अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather : राज्यात वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाचं आगमन! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

आज मुंबईत सकाळपासून पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पालघर या सर्व ठिकाणी आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पाऊस पडत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आणखी चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. शेतीची कामं रखडली आहेत. आता पावसाने पुन्हा जोर पकडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Rain Alert: आजही वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, २३ जिल्ह्यांना अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Pune Rain Alert : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ३ दिवस पावसाचा रेड अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा

पुण्यात पुढील चार दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. पुढील तीन ते चार दिवस शहरात अशाच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत तापमानात घट झाल्याने उकाड्याची तीव्रता कमी झाली आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहिल्यास तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Rain Alert: आजही वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, २३ जिल्ह्यांना अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather : राज्यात वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाचं आगमन! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com