Maharashtra Weather : थंडा थंडा कूल कूल! थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, राज्यात कुठे घसरला पारा

Maharashtra Weather Update : मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्याचा पारा कमालीचा घसरलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट कायम आहे.
Maharashtra Weather News
Maharashtra Weather NewsMaharashtra Weather News
Published On

Maharashtra Weather News : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट कायम आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्याचा पारा कमालीचा घसरलाय. अनेक ठिकाणाचे कमाल आणि किमान तापमान घसरलेय. जम्मू काश्मीर,मानालीपेक्षाही महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान कमी होतं. थंडी वाढल्यामुळे कपाटातील गरम कपडे बाहेर काढण्यात आलेत. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याचा पारा १० अंशाच्या खाली घसरल्याने हुडहुडी वाढली आहे. धुळ्याचा पारा मागील तीन दिवसांपासून पाच अंशाच्या आसपास राहिलाय. धुळे येथील कृषी महाविद्यालयात सलग दुसऱ्या दिवशी राज्याचे हंगामातील नीचांकी ४ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता कायम आहे.

राज्यात कुठे किती तापमान?

धुळे - 5° सेल्सिअस

परभणी - 6.1° सेल्सिअस

दापोली - 7.8 ° सेल्सिअस

यवतमाळ - १०° सेल्सिअस

नांदेड 11° सेल्सिअस

अमरावती - 13°सेल्सियस

सोलापूर -14 ° सेल्सिअस

पालघर - 19 ° सेल्सियस

यवतमाळ जिल्ह्यात पारा 10 अंशावर, सतर्क राहण्याचा इशारा

यवतमाळ जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने घट होत असून सर्वात कमी 10 अंश तापमानाची नोंद करण्यात आलीय. या आठवड्यात तीन अंसाने तापमान खाली आले आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे या थंडीच्या लाटेमुळे वृद्ध व मुलांमध्ये कपाचे आजार वाढले असून थंडी वाढत असल्याने प्रशासनाकडूनही नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे ग्रामीण भागात तर हवेमुळे थंडीचा कडाका आणखीनच जोर पकडत आहे.

वाढत्या थंडीतही शेतकरीवर्ग रब्बी हंगामात व्यस्त

अॅकर - यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पारा घसरत आहेत.अशात वाढत्या थंडीतही रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरीवर्ग रात्री-बेरात्री आणि भल्या पहाटे सिंचन करण्यासाठी घराबाहेर पडताहेत.त्यामुळे सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी होताहेत.

मिनी महाबळेश्वर दापोली गारठले

रत्नागिरीमधील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे दापेली शहरही गारठले आहे. दापोली किमान तापमान 7.8 सेल्सिअसवर असल्याची नोंद झाली. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी घेतला शेकोटीचा आधार घेतलाय. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची दापोलीला पसंती मिळत आहे.

धुळ्यात तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअसवर

धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे, आज धुळ्यामध्ये 5 आऊंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे, काल धुळ्यात 4 आऊंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती, या हाड गोठवणाऱ्या थंडीमुळे नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे, त्याचबरोबर सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या देखील घटताना दिसून येत आहे.

परभणीकर गारठले; पारा 6.1 अंशांवर

कायम असून पाऱ्याची घसरण सुरूच असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी जिल्ह्याचा पारा 5 अंशांवर राहिला. त्यामुळे वाढत्या थंडीने परभणीकर गारठल्याचे चित्र पाहावयास मिळाले.आज त्यात किचित वाढ झाली असून आज 6.1तापमान नोंदविले गेले आहे.गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात धुक्याची चादर दररोज सकाळी पसरत आहे. त्यामुळे जनजीवनावरसुद्धा परिणाम झाला आहे.नागरिक शेकोट्याचा आधार घेत आहेत.तसेच रब्बी हंगामातील पिकांना याचा मोठा फटका बसत आहे. दोन दिवसांमध्ये तापमानात सातत्याने घट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com