Maharashtra Weather Update: सावधान! हवामान विभागाकडून विदर्भाला येलो अलर्ट; राज्यात 'या'जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार पाऊस

Heavy Rain Alert In Vidarbha Mumbai Rain Alert In Kokan: हवामान विभागाकडून विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, ते आपण जाणून घेऊ या.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार
Maharashtra Weather UpdateSaam Tv

राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज अनेक जिल्ह्यांना पावसासाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय. ते जिल्हे नेमके कोणते आहेत, हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. आज कोकण आणि घाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह आ़ज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा?

रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पुणे या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा (Maharashtra Weather Update) म्हणजेच येलो अलर्ट आज हवामान विभागाने दिला आहे. तर नागपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा येलो अलर्ट आयएमडीने दिवा आहे.

कोल्हापुरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला (Rain Alert) आहे. आजरा तालुक्यातील साळगाव इथल्या बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता बंद झाला आहे. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. तर, चंदगड तालुक्यातील हिंडगाव इथल्या इब्राहीमपूर पुलावर घटप्रभा नदीचे पाणी आल्याने वाहतूक बंद (Heavy Rain) आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार
Maharashtra Rain Alert : छत्र्या घेऊनच घराबाहेर पडा, राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांना झोडपणार

राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ३ जूलैपर्यंत सकाळच्या २४ तासांमध्ये पावसाचा जोर जास्त होता. कोल्हापुरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. आजरा येथे १११ मिलिमीटर पावसाची नोंद (Maharashtra Rain) झाली. उर्वरित राज्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळत आहे. राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याचं चित्र आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार
Rain Updates : मुंबईसह, पुण्यात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस; कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी १७ फुटांवर, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com