Rain Update : महाराष्ट्रात पावसाची उसंत; पण पूर्व विदर्भाला येलो अलर्ट, मराठवाड्यात विजांसह सरींचा अंदाज

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात पावसाचा जोर काही भागांत वाढण्याची शक्यता. गोंदिया आणि गडचिरोलीला येलो अलर्ट असून हिंगोली, लातूर व नांदेडमध्ये विजांसह पावसाचा अंदाज आहे.
Maharastra Heavy Rain Weather Update Today News
Maharastra Heavy Rain Weather Update Today News Saam tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रात पावसाची उसंत

  • गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना आज येलो अलर्ट

  • पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार

  • उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनच्या पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी अनेक भागांत अधूनमधून हलक्या ते जोरदार सरी बरसत आहेत. दरम्यान, आज पूर्व विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

IMD च्या अंदाजानुसार, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळू शकतात. मराठवाड्यातही काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे. हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Maharastra Heavy Rain Weather Update Today News
Cucumber Benefits : काकडी सोलायची की नाही? ९०% लोक करतात ही चूक; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

उर्वरित महाराष्ट्रात प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही भागांत अधूनमधून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. त्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण सर्वत्र समान राहणार नसल्याचे चित्र आहे.

Maharastra Heavy Rain Weather Update Today News
Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

दरम्यान, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीला लागून समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून, ती जमिनीच्या दिशेने सरकण्याचा अंदाज आहे. या प्रणालीच्या हालचालीवर हवामान विभागाचे लक्ष असून, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीत काही बदल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com