Maharashtra Weather News: चिंता वाढली! राज्यात पुढील ३ दिवस उष्णतेची लाट; मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पुन्हा दणका देणार

Maharashtra Weather Report For Mumbai, Thane, Amaravati, Solapur, Akola Region: आज कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट कायम असल्याचं म्हटलं आहे.
The latest update on the Maharashtra weather forecast for Mumbai, Thane, Marathwada, Vidarbha, Kokan, and Madhya Maharashtra
The latest update on the Maharashtra weather forecast for Mumbai, Thane, Marathwada, Vidarbha, Kokan, and Madhya MaharashtraSaam Tv

राज्यामध्ये एकीकडे उन्हाचा पारा (Maharashtra Weather Update) चढत आहे. तर दुसरीकडे अवकाळीने थैमान मांडले आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानामध्ये चढ-उतार होत असल्याचं जाणवत आहे. आज कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट कायम असल्याचं म्हटलं आहे.

राज्यात अवकाळीचा जोर कमी होत नाही तोच पुन्हा एकदा उष्णतेची लाट जाणवणार आहे. राज्यात 27 ते 29 एप्रिल या तीन दिवसांमध्ये उष्णतेची तीव्र लाट असण्याची शक्यता (Heat Wave Alert) हवामान विभागाने वर्तविली आहे. ठाणे, मुंबईसह विदर्भात या उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, तसंच उत्तर कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती (Maharashtra Weather) आहे.

The latest update on the Maharashtra weather forecast for Mumbai, Thane, Marathwada, Vidarbha, Kokan, and Madhya Maharashtra
Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात 17 बळी; 15 हजार शेतकरी बाधित, 26 तासांपेक्षा अधिक काळ बत्तीगुल

मराठवाड्यापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत तसेच, मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपासून विदर्भ, मराठवाडा आणि कर्नाटकपर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय असल्याची माहिती अॅग्रोवनच्या हवाल्यानुसार (Weather Update) मिळत आहे. यामुळे ढगाळ आकाशासह राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान होत आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा कायम आहे.

धुळे (४२), मालेगाव (४२), जळगाव (४१.७), सोलापूर (४१.२), वाशीम (४०.६), ब्रह्मपुरी (४०.५), अकोला (४०.४), बीड (४०.१), वर्धा (४०.१), अमरावती (४०) या ठिकाणांवरील कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक होते. तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा (Rain) इशारा हवामान विभागाने दिला आहे.

The latest update on the Maharashtra weather forecast for Mumbai, Thane, Marathwada, Vidarbha, Kokan, and Madhya Maharashtra
Unseasonal Rain : सलग चौथ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस; गोंदियात फळ भाज्यांसह धान पिकाचे नुकसान

गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, किनारी ओडिशा, मणिपूर, पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश आणि केरळमध्ये हलका ते मध्यम मेघगर्जनेसह पाऊस झाला आहे. लडाख, लक्षद्वीप, पूर्व मध्य प्रदेश, मेघालय, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, (Weather) गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी हलका पाऊस झाला.

आजपासून उत्तर-पश्चिम भारतातील हवामान बदलणार आहे. त्यामुळे यूपीसह अनेक राज्यांमध्ये पावसासोबत वादळाचा इशारा देण्यात आलाय. पुढील 5 दिवस पूर्व आणि दक्षिण भारतात तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची (Heat Wave Alert) शक्यता आहे. 26 ते 28 एप्रिल दरम्यान उत्तर-पश्चिम भारतातील राज्यांमध्ये पावसाचा नवीन टप्पा सुरू होणार आहे. आज दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय वादळाचा इशाराही जारी करण्यात आलाय. पुढील २४ तासांमध्ये अरुणाचल प्रदेशात पाऊस, विजांच्या कडकडाटासह हिमवृष्टी, वादळ आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये पुढील 2 ते 3 दिवसांत तुरळक पावसाची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com