Maharashtra Weather : दिवसा थंडावा तर रात्री ऊबदारपणा! राज्याचे वातावरण आज कसं असेल?

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील थंडी पुन्हा गायब झाली आहे. आजपासून ढगाळ वातावरण निवळण्यास सुरूवात होईल, दोन दिवसानंतर राज्यात पुन्हा एकदा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather: महाराष्ट्र गारठला! आठवडाभर कसं राहिल वातावरण?
Maharashtra Weather UpdateSaam Tv
Published On

Maharashtra Weather Update in Marathi: मागील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे गारठा कमी झालाय. किमान आणि कमाल तापमानातही थोडी वाढ झाली आहे. पुढील काही दिवस राज्यात असेच वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलाय, त्यामुळे राज्यातील थंडी कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही ठिकाणाचा पारा १० अंशापेक्षा जास्त झालाय. आजपासून राज्यात ढगाळ वातावरण कमी होण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांत किमान तापमानात हळूहळू घट होत गारठा वाढण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. राज्यात पुढील काही दिवस दिवसा थंडावा तर रात्री ऊबदारपणा राहण्याची शक्यता आहे. संक्रातीनंतर राज्यात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी जाणवू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Maharashtra Weather: महाराष्ट्र गारठला! आठवडाभर कसं राहिल वातावरण?
Success Story: आईवडील आर्मीत ऑफिसर, लेकीने २२ व्या वर्षी क्रॅक केली UPSC; IAS चंद्रज्योती यांचा प्रेरणादायी प्रवास

सध्या मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात दुपारी ३ चे कमाल तापमान सरासरीच्या जवळपास एक डिग्रीने कमी तर पहाटेचे किमान एक डिग्रीने वाढलेले जाणवत आहे. त्यामुळे तेथे दिवसा आल्हाददायक पणा तर रात्री थंडीऐवजी ऊबदारपणा जाणवत आहे. उर्वरित खान्देश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील एकूण २९ जिल्ह्यात मात्र कमाल तापमानात परिस्थिती अशीच असली तरी पहाटेचे किमान तापमानातील वाढ आहे. त्यामुळे काल शनिवार दि.११ जानेवारीपासून  संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कमी झाला आहे.

Maharashtra Weather: महाराष्ट्र गारठला! आठवडाभर कसं राहिल वातावरण?
Nashik road Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात; ५ जण ठार, मृतांची नावे आली समोर

थंडीचा हा प्रभाव, बंगालच्या उपसागराततून  महाराष्ट्रावर आर्द्रता आणणाऱ्या वाऱ्यामुळे पुढील आठवडाभर म्हणजे रविवार दि. १८ जानेवारी पर्यंत असाच कमी जाणवणार आहे. आठवड्यानंतर मात्र, त्यापुढील तीन दिवस म्हणजे, सोमवार दि. १९ ते २१ जानेवारी दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा काहीशी थंडी जाणवेल. थोडक्यात जानेवारी महिन्याच्या उर्वरित दिवसात थंडीचा चढ-उतार असाच राहू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. प्रशांत महासागरात अपेक्षित 'ला-निना 'चे अस्तित्व आढळू लागले आहे.  सध्याचे त्याचे हे अस्तित्व  कमकुवत स्वरूपाचेच जाणवेल, असेही सांगण्यात आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com