विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. दरम्यान, सकाळ माध्यम समूहाने एक्झिट पोल जाहीर केला आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, साक्री मतदारसंघातून प्रवीण चौरे हे संभाव्य आमदार होणार आहेत.
साक्री मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. साक्री मतदारसंघात काँग्रेसचं पारडं जड दिसत आहे.या मतदारसंघात पक्षफुटीचा परिणाम दिसत आहे. साक्री मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध मंजुळा गावित अशी लढत होणार आहे. काँग्रेस मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या मंजुळा गावित यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
साक्रीमध्ये पक्षफुटीचा परिणाम पाहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे. अनुसुचित जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. एकूण १८ उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार मंजुळा गावित यांना फटका बसू शकतो. भाजपच्या उमेदवारांनी या मतदारसंघात बंडखोरी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीला फटका बसू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.