महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम

MLC Elections: विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपनं अनेक ठिकाणी मित्रपक्ष असणाऱ्या शिंदेंच्या पक्षातील बंडखोरांना थंड केलं असलं तरी शिंदेंना आपल्याच पक्षाविरोधातील बंडखोरी थांबवता आलेली नाही.... त्यामुळे विधानपरिषदेत शिंदेंच्या सरदारांनी कशी माघार घेतलीय? आणि शिंदेसेना कशी नापास झालीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
MAHARASHTRA MLC ELECTION 2026
MAHARASHTRA MLC ELECTION 2026saam tv
Published On: 

राज्यातील विधानपरिषदेच्या 5 मतदारसंघांतील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी चांगलाच हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला...महायुतीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या एका फोनवर अनेक मतदारसंघांत बंडखोरांनी तलवार म्यान केली असली, तर काही ठिकाणी मात्र बंडखोरी मोडून काढण्यात नेतृत्वाला अपयश आलयं...त्यामुळे राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघांत काही ठिकाणी पक्षांचे अधिकृत उमेदवार, तर काही ठिकाणी पक्षांतर्गत बंडखोर आणि मैत्रीपूर्ण लढतींचे चित्र निर्माण झालयं...

शिंदेच्या सरदाराची माघार

महायुतीकडून भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, शिंदेसेनेच्या मंगेश चिवटे यांनी अर्ज दाखल केल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र वरिष्ठांच्या सूचनेनंतर चिवटे यांनी आपला अर्ज मागे घेतला असला तरी शिंदेसेनेचेच प्राध्यापक सचिन सानप यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानं पुणे शिक्षकमधील बंडखोरी पूर्ण शमली नाही.....

भाजपनं पुणे पदवीधरसाठी स्मिता जाधव यांना अधिकृत उमेदवारी देऊनही दादांच्या राष्ट्रवादीचे

प्रताप माने यांनी बंडखोरी केली होती...मात्र वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीनंतर माने यांनी अर्ज मागे घेतल्यानं भाजपचा मार्ग सुकर झालाय..

नागपूर पदवीधर मतदारसंघात अर्ज माघारीनंतरही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांसमोरील बंडखोरीचे आव्हान कायम आहे. भाजपनं नागपूर पदवीधरमध्ये सुधाकर कोहळेंना उमेदवारी दिली..त्यामुळे लोकजागृती मोर्चाच्या रमण सेनाड यांनी माघार घेतली असली तरी भाजपच्या बंडखोर अनिल सोलेंनी नॉट रिचेबल होतं बंडखोरी कायम ठेवलीय... त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढलीय..

अमरावती शिक्षक मतदारसंघ

शिंदेसेनेच्या या जागेवर विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय..मात्र शिंदेसेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे, भाजपचे बंडखोर संगीता शिंदे-बोंडे, शेखर भोयर, सुमित पवार यांनी बंडखोरी कायम ठेवल्यानं शिंदेसेनेची डोकेदुखी वाढलीय...ज्यामुळे विधानपरिषदेत शिंदेसेना बंडखोरी शमवण्यात नापास ठरलीय...

याउलट छ.संभाजीनगरमध्ये

दादाच्या राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांच्याविरोधात बंडखोर करणाऱ्या एम.के. देशमुख यांनी पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर माघार घेतली

दुसरीकडे महायुतीतच नव्हे तर मविआतही 3 जागांवर बंडखोरी कायम आहे...

नागपूर पदवीधर मतदारसंघात

काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्याविरोधातील बंडखोरी पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश कराळे यांनी कायम ठेवलीय...

अमरावती शिक्षक मतदारसंघाही

काँग्रेसच्य अदिती पोहरेंविरोधात ठाकरेसेनेचे दत्तात्रय लहानेंनी बंडखोरी कायम ठेवलीय...

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातही

ठाकरेसेनेचे दिलीप घुगे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील हे दोघेही मैदानात कायम आहेत. त्यामुळे येथे महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे.

एकंदरित महायुतीत भाजपनं मित्रपक्षांमधून होणारी बंडखोरी थांबवली असली तरी पक्षातील बंडखोरी काही ठिकाणी कायम आहे... त्याउलट शिंदेसेनेला मित्रपक्षांची आणि स्व: पक्षातील बंडखोरीही अमरावती शिक्षक मतदारसंघात थांबवता आली नाही... त्यामुळे

अर्ज माघारीच्या मुदतीनंतर आता विधानपरिषदेच्या पाचही मतदारसंघांतील अंतिम लढतीचं चित्र स्पष्ट झालयं.. त्यामुळे बंडखोरांमुळे महायुती आणि मविआच्या अधिकृत उमेदवारांना तोटा होणार की फायदा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com