Maharashtra Political Reaction: 'महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचं खाऊन...'; तिखट अन् झणझणीत प्रतिक्रियांमधून समजून घ्या आजचं राजकारण

Maharashtra Political Reaction: भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांना 'एक्स' अकाऊंटवरून पोस्ट करत इशारा दिला. या पोस्टनंतर सुषमा अंधारे यांनी शिंदे सरकावर निशाणा साधला आहे.
Maharashtra Political Reaction
Maharashtra Political ReactionSaam tv
Published On

Maharashtra Political News:

ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांना 'एक्स' अकाऊंटवरून पोस्ट करत इशारा दिला. या पोस्टनंतर सुषमा अंधारे यांनी शिंदे सरकावर निशाणा साधला आहे. याचबरोबर दिवसभरातील विविध राजकीय नेत्यांच्या झणझणीत प्रतिक्रियांमधून आजचं राजकारण समजून घेऊयात. (Latest Marathi News)

३०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटीलच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याच प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे यांनी आरोप केल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांचे लवकरच महुआ मोइत्रा यांच्यासारखे हाल होतील,असा इशारा दिला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Political Reaction
Uday Samant News: ललित पाटील प्रकरणी आरोप करणाऱ्यांकडे माहिती असल्याने त्यांचीही चौकशी करा; उद्योग मंत्री उदय सामंत

मोहित कंबोज यांच्या पोस्टनंतर सुषमा अंधारे म्हणाल्या, 'महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्राच्या बहिण-लेकीना बिनधास्तपणे धमकावण्याची हिम्मत देवेंद्रजी आपल्या आशीर्वादामुळे येते. मी फडणवीससाहेबांची आभारी आहे'.

किरण पावसरकर यांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना किरण पावसकर म्हणाले,'उद्धव ठाकरे यांनी राजीमामा दिला नसता तर ही परिस्थिती आली नसती. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवेळी सभागृहात आले असते, तर अशी परिस्थिती आली नसती. ठाकरे मैदान सोडून पळून गेले'.

ललित पाटील प्रकरणावर भाष्य करताना पावसकर म्हणाले, 'ललित पाटील प्रकरणी ललित पाटील आणि संजय राऊत यांची नार्को टेस्ट करावी, उद्धव ठाकरेंनी ललित पाटीलला शिवबंधन बांधले आहे'.

Maharashtra Political Reaction
MLA Disqualification Case: मोठी बातमी! 34 याचिकांची 6 याचिकेत विभागणी, आमदार अपात्रतेप्रकरणी आजच्या सुनावणीत काय घडलं?

बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, 'चंद्रकांत पाटील जर दर आठ दिवसांनी अमरावतीमध्ये येत असेल तर चांगलं आहे. चंद्रकांत पाटील शब्दाचे पक्के आहेत. चंद्रकांत पाटील अमावस्या आणि पौर्णिमेचे चंद्र होऊ नये. ते रोजचेच चंद्र व्हावे. त्यांनी विदर्भातली अमावस्या पौर्णिमेकडे न्यावी. आम्हाला चंद्रकांत पाटील यांच्याकडून अशी अपेक्षा आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com