Uday Samant News: ललित पाटील प्रकरणी आरोप करणाऱ्यांकडे माहिती असल्याने त्यांचीही चौकशी करा; उद्योग मंत्री उदय सामंत

Nandurbar News : ललित पाटील प्रकरणी आरोप करणाऱ्यांकडे माहिती असल्याने त्यांचीही चौकशी करा; उद्योग मंत्री उदय सामंत
Uday Samant
Uday SamantSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: ललित पाटील प्रकरणात विरोधकांकडून आरोप केले जातात. मात्र जोरात बोलून खोटं सत्य बसवण्याचा प्रयत्न (Nandurbar) विरोधकांकडून केला जात आहे. ज्या मंत्र्यांवर आरोप करण्यात आले आहेत; त्यांच्याकडे विरोधकांना कायदेशीर नोटीसा देण्यात आल्या आहेत. तर विरोधकांकडे ललित पाटील प्रकरणाची मोठ्या प्रमाणात माहिती असून त्यांचीही चौकशी करण्यात यावी; अशी मागणी यावेळेस उद्योग मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी केले आहे. (Live Marathi News)

Uday Samant
Jalna News: आंदोलकांना पोलिसांनी समज देवून सोडले; दानवेंच्या कार्यक्रमात पोलिसांंसोबत झाली होती धक्काबुक्की

नंदुरबार जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे गट आणि राज्यातील (Shiv Sena) विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली. तसेच आरोप करणाऱ्यांनी याचेही उत्तर द्यावे की सचिन वांजे हा कुणाचा पण होता आणि त्याच्या माध्यमातून वसुली फोन करत होते असाही प्रश्न त्यावेळेस त्यांनी उपस्थित केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uday Samant
Satara News: पालकमंत्रांच्या घरासमोर हॉकर्सचा आत्मदहनाचा प्रयत्न: खंडणी मागणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने संतप्त

मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारकडून काम सुरू असून समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिलं जाईल. मात्र ते कधी हे सांगण्यास त्यांनी असमर्थता दाखवली. मराठा समाजातील तरुणांनी टोकाची पावलं उचलू नये; असे आव्हान त्यांनी यावेळेस मराठा समाजातील तरुणांना केले आहे.

Uday Samant
Kalyan News : आई- वडिलांना अपेक्षा होती पोलिस बनायची; खुश करण्यासाठी केला अजब प्रताप

बाहेरून उद्योग येत आहेत 
राज्यातील उद्योग बाहेत जात असून राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप विरोधकांकडून केला जात होता. मात्र राज्यात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत असून गुजरात आणि आसाममधूनही उद्योग राज्यात येत आहेत. या गोष्टी राज्यातील विरोधकांना दिसत नाहीत का? असाही प्रश्न यावेळेस उद्योग मंत्री उदय सामान त्यांनी उपस्थित केला.

आमदार आपात्रेच्या संदर्भात वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र अपात्र त्या सुनावणी त्यावेळेस पिटीशन कोणी दाखल केली, सुनावणी कोणामुळे लांबणीवर होत आहे; हे राज्यातील सर्वे जनतेला माहिती. वेळ कोणी मागून घेतली सर्व सुनावण्या एकत्र घेण्याचे मागणी कोणी केली हे जनतेला माहीत असून अध्यक्ष योग्य पद्धतीने काम करत असल्याचे मंत्री उदय सामान त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com