Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार

maharashtra teacher graduate mlc election result live update: विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. मतमोजणी, कल, निकाल आणि प्रत्येक घडामोडीचे थेट अपडेट्स
Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: विधान परिषदेच्या ५ जागांसाठी
Maharashtra Vidhan Parishad Election ResultSaam Tv

Amravati: अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी सुरू होत आहे.

भाजपाच्या बंडखोर उमेदवार तथा राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे या अमरावतीच्या लोकशाही भवनमध्ये मतमोजणी प्रक्रियेसाठी दाखल झाल्या आहे,

माझे भाऊ अनिल बोंडे यांचा मला आशीर्वाद आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या बंडखोर संगीता शिंदे यांनी दिली.

Pune: पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार मतमोजणी

पुणे - पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज मतमोजणी होत आहे

पदवीधरांसाठी १०० आणि शिक्षकांसाठी ४२ मतमोजणी टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.

आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार

पुण्यात आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत शिक्षक मतदारसंघात दुसऱ्या पसंतीच्या मतांची भूमिका, तर पदवीधर मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतांची आघाडी हे दोन मुद्दे निर्णायक ठरू शकतात.

मात्र, प्रत्यक्ष निकालाचे चित्र मतदानातील उमेदवारनिहाय कल आणि मतांच्या वैधतेवर अवलंबून असेल

शिक्षक मतदारसंघात महायुतीचे कौस्तुभ गवाडे, शिवसेना समर्थित सचिन सानप आणि इतर उमेदवारांमध्ये कोणाला किती मते मिळतात, याकडे लक्ष असेल.

Nagpur: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार

विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार

मानकापूर क्रीडा संकुलला सकाळी आठ वाजता मतमोजणीला होणार सुरूवात

या मतमोजणीसाठी 84 टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

या निवडणुकीत रिंगणात असलेल्या 38 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतमोजणीतून होणार

मुख्य लढती काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात होणार

MLC Result: विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा आज निकाल

मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात होणार

महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com