ऊस दरावरून दोन माजी मंत्र्यांनी एकमेकांचे बाप-काका काढले

Maharashtra Sugarcane Price Protest: मराठवाडा, विदर्भात दुष्काळामुळे शेतकरी होरपळलाय. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात उस दराचा प्रश्न पेटलाय. उसाला 5 हजार दराची मागणी करताच शेतकरी नेते आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलीये. एकमेकांचे बाप-काका काढणारे हे नेते कोण आहेत ? भिमाशंकर कारखान्याने शेतकऱ्यांना काय ऑफर दिलीये ? पाहूया एक रिपोर्ट...
Maharashtra sugarcane farmers demand ₹5,000 per tonne
Maharashtra sugarcane farmers demand ₹5,000 per tonnesaam tv
Published On: 

एकीकडे दुष्काळामुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडलाय. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या दरावरुन घमासान सुरु आहे. ऊस दर बैठक निष्फळ ठरल्यामुळे सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. कडेगाव तालुक्यात विविध साखर कारखान्यांकडे जाणारे १५० हून अधिक उसाचे ट्रॅक्टर रोखून धरलेयत. उसाला प्रति टन ५ हजार रुपये दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा संघटनेनं दिलाय. तर कोल्हापूरच्या कोगनोळी टोलनाक्यावर राजू शेट्टींनी चक्काजाम आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती...मात्र या पाच हजाराच्या दरावरून राजू शेट्टी आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी थेट एकमेकांचा बाप आणि काका काढलाय.

तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे साखर कारखानेही संकटात येण्याची भीती आहेय. दुष्काळ आणि वाढत्या तापमानामुळे उसाचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दरवर्षी १६० दिवस चालणारे कारखाने यंदा ८० ते १०० दिवसच चालण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात तर साखर कारखाने सुरू होणार की नाही, अशी स्थिती असल्याचं दिसतंय. त्यामुळे यंदा उसाचा दर आणि दुष्काळामुळे घटणारं उत्पादन अशा दुहेरी संकटात ऊसाची कारखानदारी सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातून कसा मार्ग निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com