Maharashtra : सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांसह ९ अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई, तडकाफडकी केलं निलंबन; धक्कादायक कारण समोर

Maharashtra Solapur Breaking News : सोलापुरातील माढा ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेकडून साफसफाई करून घेतल्याच्या धक्कादायक प्रकरणात अखेर आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. ९ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
SOLAPUR MADHA HOSPITAL CASE: 9 STAFF SUSPENDED AFTER POSTPARTUM WOMAN FORCED TO CLEAN WARD
SOLAPUR MADHA HOSPITAL CASE: 9 STAFF SUSPENDED AFTER POSTPARTUM WOMAN FORCED TO CLEAN WARDSaam tv
Published On
Summary
  • माढा ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेकडून साफसफाई करून घेतली

  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • ९ कर्मचाऱ्यांचे निलंबन

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील माढा ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेकडून वॉर्ड आणि स्वच्छतागृहाची साफसफाई करून घेतल्याच्या धक्कादायक प्रकरणात अखेर आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल १४ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास मेमाणे यांच्यासह एकूण ९ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आरोग्य विभागात आणि परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण एप्रिल २०२५ मध्ये समोर आले होते. माढा तालुक्यातील खैराव येथील हेमा धडे (वय ३०) या प्रसूतीसाठी १ एप्रिल रोजी माढा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्याच रात्री त्यांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाली. प्रसूतीनंतर उपचारासाठी त्या रुग्णालयात दाखल असतानाच त्यांच्याकडून आणि त्यांच्या पतीकडून वॉर्ड तसेच स्वच्छतागृहाची साफसफाई करून घेतल्याचा आरोप झाला होता.

SOLAPUR MADHA HOSPITAL CASE: 9 STAFF SUSPENDED AFTER POSTPARTUM WOMAN FORCED TO CLEAN WARD
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला होता. प्रसूतीनंतर विश्रांतीची गरज असलेल्या महिलेकडून अशी कामे करून घेणे हे अत्यंत अमानवीय आहे. सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. घटनेनंतर आरोग्य विभागाने चौकशी सुरू केली होती. चौकशी अहवालाच्या आधारे संबंधित कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये डॉ. विलास मेमाणे, दिव्या गवळी, स्मिता जमदाडे, चंद्रकांत गोवर, सौदागर जाधव, सत्यजीत राठोड, शुभम डाकूलवार, भरत कोटीवाना आणि स्वप्नील जाधव यांचा समावेश आहे.

SOLAPUR MADHA HOSPITAL CASE: 9 STAFF SUSPENDED AFTER POSTPARTUM WOMAN FORCED TO CLEAN WARD
Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

दरम्यान, या कारवाईचे स्वागत करताना सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. घटना उघडकीस आल्यानंतर कारवाईसाठी तब्बल 14 महिने का लागले, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोषींवर कारवाई झाली असली तरी विलंबामागील कारणे समोर येणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे ग्रामीण रुग्णालयांतील व्यवस्थापन, रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता पुढील चौकशीत आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com