निवडणूक आयोगाची विशेष पडताळणी मोहीम म्हणजेच SIR अंतर्गत महाराष्ट्रात तब्बल 2 कोटींहून अधिक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर तब्बल 2 कोटी 7 लाख मतदारांची नावं वगळण्यात आल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे, यात 17 लाख दुबार मतदार आहेत, तर 34 लाख मतदार मृत असल्याचं नमूद करण्यात आलंय. मात्र, निवडणूक आयोगाच्या SIR मोहीमेवर विरोधकांनी सुरूवातीपासूनच आक्षेप घेतला होता. त्यात आता पुन्हा प्रारुप मतदार यादी जाहीर झाल्यानं विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. एकट्या मुंबईतील 36 लाख मतदारांची नावे वगळल्याचा दावा ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. तर दुसरीकडे, काँग्रेसनंही सरकारवर टीकेची तोफ डागलीये...
त्यामुळे आता यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र तुमचही नाव यादीतून वगळलं गेलं असेत तर त्यासाठी आयोगानं काही हरकती दाखल करून नाव समाविष्ट करण्यासाठी मुदत दिलीय.
मतदार यादीत नसेल तर हे करा
- 30 सप्टेंबरर्यंत दावे आणि हरकती दाखल करा
- अनुपस्थित, स्थलांतरित किंवा दुबार मतदारात उल्लेख आहे का हे तपासा
- नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म 6 भरा
- नावातील दुरुस्ती किंवा बदलासाठी फॉर्म 8 भरा
- 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान सुनावणी
- 4 नोव्हेंबरला अंतिम यादी जाहीर होणार
खरंतर, SIR मोहिमेनंतर देशातील विविध राज्यांत लाखोंच्या संख्येनं मतदार वगळण्यात आलेत. मात्र महाराष्ट्रानं यात उच्चांक गाठला. पुन्हा नाव नोंदवण्यासाठी आयोगानं दिलेल्या मुदतीत किती मतदार अर्ज भरून देणार आणि किती जणांची नावं मतदार यादीत समाविष्ट केली जाणार याबाबत उत्सुकता आहे. मात्र 2 कोटींपेक्षा जास्त मतदार वगळले गेल्यामुळे महाराष्ट्रातल्या SIR वरून देशभरात राजकारण पेटणार एवढं नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.