Maharashtra Rain : राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; वादळी वारा अन् गारांचा वर्षाव, बळीराजाचे नुकसान

Maharashtra Rain Update : राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा दिलाय. राज्यातील विविध भागात वादळी वारा आणि गारांचा वर्षाव झाला. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.
maharashtra rain update
maharashtra rainSaam tv
Published On

राज्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपलं आहे. ऐन उन्हाळ्यात बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात कोसळलेल्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील सोलापूर, सातारा, वाशिम, कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे काही भागात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. मात्र, राज्यात अचानक कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

maharashtra rain update
West bengal News : गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, ७ जण दगावले, मृतांमध्ये ४ लहान मुलांचा समावेश

पंढरपूरला पावसाने झोडपले

पंढरपुरात आज अवकाळी पावसाच्या धारा कोसळल्या. शहराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालं. दिवसभर उकाडा जाणवत होता. मात्र आज सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. या अवकाळी पावसाने काही प्रमाणात काढणीस आलेल्या पिकांना फटका बसलाय. शिवाय बेदाणावर अवकाळी पावसाचा परिणाम झालाय.

maharashtra rain update
New Rules : गॅस सिलिंडर, UPI आणि बँक...;1 एप्रिलपासून नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष महागात पडणार, जाणून घ्या महत्त्वाचे बदल

साताराच्या कराडमध्ये गारांचा खच

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये अनेक ठिकाणी गारांचा खच पाहायला मिळत आहे. कराडला अवकाळी पावसासह गारांनी झोडपले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

maharashtra rain update
Beed Teachers strike : आठ दिवसांपासून उपोषण, साधा फोन नाही, जीवाचं बरं वाईट झाल्यास...; शिक्षकांचा सरकारला इशारा

अवकाळीने शेतीला फटका

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात अवकाळी पाऊस बरसला. त्यानंतर आज पुन्हा वाशिम शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस कोसळला. या पावसामुळे कांदा बीज,हळद पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

maharashtra rain update
Share Market Today : नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच दणका; निफ्टी-सेन्सेक्समध्ये पडझड, कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स?

राजापुरात अवकाळी पावसाची हजेरी

राजापुरात दिवसभर ढगाळ वातावरणानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरात सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान खात्याने आधीच अवकाळीचा अंदाज वर्तवला होता. राजापूर तालुक्यात तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडलाय. पावसामुळे आंबा व्यापारी चिंतेत पडलाय. आधीच उत्पादन कमी आणि त्यात आता अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com