Maharashtra School: पालकांसाठी महत्त्वाची बातमी! विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं पुन्हा वाढलं

Maharashtra School News: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता सर्व विषयांसाठी इंटिग्रेटेड पुस्तक रद्द करण्यात आले आहे. आता सर्व विषयांसाठी वेगवेगळे पाठ्यपुस्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra School
Maharashtra SchoolSaam Tv
Published On

विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं पुन्हा वाढलं आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं कमी करण्यासाठी राज्य सरकारने घटक चाचणीनिहाय सर्व विषयांचं एकच पुस्तक तयार केलं होतं. मात्र यंदाच्या वर्षी हे इंटिग्रेटेड पाठ्यपुस्तक रद्द करून पुन्हा एकदा प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पुस्तक देण्यात आलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं पुन्हा एकदा वाढलंय.

Maharashtra School
Maharashtra School : महाराष्ट्रात शाळा कधीपासून सुरू होणार? शालेय शिक्षण विभागाने सांगितली अधिकृत तारीख

2023 साली राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं कमी करण्यासाठी प्रत्येक तिमाहीच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचचं मिळून एक, अशी वर्षाची चार इंटिग्रेटेड पुस्तकं तयार केली होती. मात्र या पुस्तकांच्या आधारे शिकवताना मागील संदर्भ देता येत नाहीत आणि पालकांनाही विद्यार्थ्यांना शिकवताना अडचणी येतात, असं कारण देत ही पुस्तकं रद्द करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षीपासून पुन्हा एकदा प्रत्येक विषयाचं स्वतंत्र पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात आलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं पुन्हा वाढलंय. याबाबत कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विचारलं असता, राज्य सरकारने हा निर्णय पालक आणि शिक्षकांचा फीडबॅक घेऊनच घेतला असून यावर उपाय म्हणून आता शिक्षकांनी नियोजन करून ज्या विषयांचे तास असतील त्याचं वेळापत्रक तयार करून हवी तीच पुस्तकं विद्यार्थ्यांना आणायला सांगा, जेणेकरून त्यांच्या पाठीवरील ओझं कमी होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra School
School Closed : रायगडमध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी, आज अतिवृष्टीचा धडकी भरवणारा इशारा

विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके घेऊन जाताना खूप जास्त ओझं होतं. त्यामुळे त्यांनी पाठीचं दुखणं सुरु होऊ शकतं. विद्यार्थ्यांपेक्षा बॅगेचं वजन जास्त असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तके कमी करण्याची मागणी पालकांनी केली होती. त्यानंतर एकच पुस्तक देण्यात आले होते. परंतु आता त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळी पुस्तके देण्यात आली आहेत.

Maharashtra School
Gifts Ideas For SSC Students : 10वी पास विद्यार्थ्यांसाठी बेस्ट गिफ्ट्स आयडिया, वस्तू पाहताच मुलं होतील खुश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com