Weather Update : महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा,'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

Maharashtra Weather Today Update News : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Weather Update News
Weather Update News saam tv
Published On: 
Summary
  • महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल

  • अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

  • विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला

  • नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. बंगालच्या उपसागरातील हवामानातील घडामोडींचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, राज्यातील उर्वरित भागांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळू शकतात.

Weather Update News
Friday Horoscope : आनंदाची बातमी मिळणार! लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ ५ राशींच्या लोकांवर होणार पैशांचा वर्षाव; वाचा आजचे राशिभविष्य

मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात.

Weather Update News
Ration Card : पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांचे मोफत धान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य

बंगालच्या उपसागरात 'अर्णब'चं थैमान

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील 'अर्णब' चक्रीवादळ धडकल्यानंतर त्याचा प्रभाव कमी होत असला, तरी हवामानात वेगवेगळे बदल बघायला मिळत आहेत. या चक्रीवादळामुळे दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. याचदरम्यान दक्षिण अंदमान समुद्रात आणखी एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. आज पुन्हा चक्रवादळ तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.