Maharashtra Politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये खैरे-दानवेंचा वाद का पेटलाय? ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Khaire-Danve Dispute: छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद विकोपाला गेलाय. खैरेंनी थेट दानवेंवर आरोपांच्या फैरी झाडल्यात. मात्र संभाजीनगरमध्ये खैरे-दानवे वाद का पेटलाय? त्यावर दानवेंनी काय प्रतिक्रीया दिलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.
Maharashtra Politics:
Khaire-Danve Dispute
Published On

ठाकरे गटाला आधीच गळतीचं ग्रहण लागलंय. अगदी नगरसेवकांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत अनेकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला असतानाच. एकेकाळचा शिवसेनेसाठी बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलायं..हा वाद तसा दोन जुन्या नेत्यांमधला आहे. होय. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंमधील वाद.

लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आता अधिक तीव्र झालाय. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरे यांनी दांडी मारल्याने हा वाद पुन्हा पेटला. यावरून छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद विकोपाला गेल्याची चर्चा रंगली आहे. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद हा शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत राजकारणाशी निगडीत आहे.दोघांमधील मतभेद अनेकदा उघड झालेत.

Maharashtra Politics:
Dr. Babasaheb Ambedkars birth Anniversary: शिंदे आणि पवारांचं भाषण रोखलं; भाषणाची संधी न मिळाल्याने समर्थक नाराज

खैरे,दानवे वाद चव्हाट्यावर

लोकसभा निवडणूक 2024, उमेदवारीवरुन खैरे-दानवे वाद,

खैरेंना उमेदवारी,दानवे नाराज

राजू शिंदेंच्या पक्षांतरानंतर वाद, खैरेंकडून दानवेंवर गंभीर आरोप

दानवे नंतर आलेले,काड्या करणारे - खैरे

पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि तक्रारी

उद्धव ठाकरेंकडे दानवेंची तक्रार करणार - खैरे

लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर दानवेंनी खैरेंवर फोडलं

2022- पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम पत्रिकेत दानवेंचं नाव नसल्यानं वाद

Maharashtra Politics:
Maharashtra Politics: ठाकरेंच्या मुखपत्रातून टीका फुले विरुद्ध फडणवीस?

दरम्यान, ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर आल्यानं शिंदे गटाला आयतं कोलीत मिळालं..या वादावर मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी संधी साधत खैरेंना शिंदे गटात येण्याची ऑफर दिली. एकीकडे खैरेंनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याची घोषणा केल्यानं हा वाद पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या वादामुळे छत्रपती संभाजीनगरसारख्या जिल्ह्यात ठाकरेंची सेना अंतर्गत कलहानं कमकुवत झालीये का असाही सवाल उपस्थित झालायं..याचा शिंदे गट कसा राजकीय फायदा घेणार हेच पाहायचं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com