Maharashtra Politics: ठाकरेंच्या मुखपत्रातून टीका फुले विरुद्ध फडणवीस?

Phule vs Fadnavis: फुले चित्रपटावरुन पेटलेल्या वादात आता ठाकरे गटानेही उडी घेतलीय.. ठाकरे गटाने थेट फडणवीसांवरच निशाणा साधलाय... नेमकं काय घडलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
mahatma fule
mahatma fule saam tv
Published On

फुले विरुद्ध फडणवीस, ठाकरे गटाचा हल्लाबोल

ठाकरेंच्या मुखपत्रातून टीका

'फुले विरुद्ध फडणवीस, वाद राऊतांच्या डोक्यात'

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यावर आधारित फुले चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.. तर या वादात उडी घेत ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून हा वाद फुले, आंबेडकर विरुद्ध फडणवीस असल्याचा टोला लगावलाय.. ठाकरेंच्या मुखपत्रात नेमकं काय म्हटलंय? पाहूयात...

mahatma fule
Raigad Politics: रायगडमधील राजकारण फिरलं; जयंत पाटलांना धक्का, भाऊ सोडणार भावाची साथ

ठाकरेंच्या मुखपत्रात नेमकं काय? (HEADER)

फुले चित्रपटावरुन महाराष्ट्रात अकारण वाद

फुले चित्रपटातील प्रसंगांना कात्री लावण्यासाठी ब्राह्मण संघटनांच्या धमक्या

फडणवीस ब्राह्मण संघटनांना सहज गप्प करु शकतात

ब्राह्मण समाज फडणवीसांच्या शब्दाबाहेर नसल्याचा दावा

फडणवीसांकडून काश्मीर फाईल्स, ताश्कंद फाईल्स आणि छावा सिनेमावर भाष्य

छावा सिनेमानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद फडणवीसांनी शांत केला

मग फुले चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी फडणवीस पुढाकार का घेत नाहीत?

mahatma fule
Sindhudurg Crime News : आधी अपहरण केलं, नंतर नग्न करुन मारहाण करत हत्या; सिंधुदुर्गमधील दोन वर्षापूर्वीचं हत्याकांड समोर

हे सवाल करत ठाकरेंच्या मुखपत्रातून फडणवीसांवर निशाणा साधलाय... एवढंच नाही तर हा वाद फुले, आंबेडकर विरुद्ध फडणवीस असं वळण घेण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय...त्यावरुन चंद्रकांत पाटलांनी जोरदार पलटवार केलाय..

फुले सिनेमातील दृश्यावरुन बहुजन विरुद्ध ब्राह्मण हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.. त्यातच ठाकरे गटाने या प्रकरणात फडणवीसांकडे बोट दाखवलंय.. त्यामुळे छावा सिनेमानंतर तापलेल्या वातावरणात हस्तक्षेप करुन फडणवीसांनी जसा वाद थंड केला तसा हा वादही शमवण्यात येणार का? याकडे लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com