Maharashtra Politics: शिवसेना आणि राष्ट्रवादीत कोण खुर्द कोण बुद्रुक? पक्ष फुटीवर संभाजीराजे छत्रपतींचा सवाल

Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांनी महायुती आणि महाविकास आघाडीला टोला लगावलाय. तिसऱ्या आघाडीच्या परिवर्तन महाशक्तीच्या मेळाव्यात बोलतांना त्यांनी राज्यातील राजकारणावर संतपा व्यक्त केला.
Maharashtra Politics: शिवसेना आणि राष्ट्रवादीत कोण खुर्द कोण बुद्रुक? पक्ष फुटीवर संभाजीराजे छत्रपतींचा सवाल
Sambhaji Raje Chhatrapati
Published On

राज्यातील पक्ष फुटीच्या राजकारणावर संभाजीराजे छत्रपती संताप व्यक्त केलाय. गाव दोन नावांचे असतात तसे कोण आहे, राष्ट्रवादी खुर्द, कोण आहेत? राष्ट्रवादी बुद्रुक, कोण आहे ? शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक तर हे का? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केलाय. ते तिसऱ्या आघाडी परिवर्तन महाशक्तीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळव्यात बोलत होते.

राज्यातील राजकारणात उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीचा मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला. या मेळाव्याला छत्रपती संभाजीराजे, आमदार बच्चू कडू, राजू शेट्टी, वामनराव चटप, शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह तिसऱ्या आघाडीत सहभागी झालेल्या विविध पक्ष- संघटनांचे प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात महाविकास आघाडी नेत्यांवर आणि महायुती सरकारवर सर्वच नेत्यांनी जोरदार टीका केली.

राज्यातील सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, गरीब सगळ्यांचे हाल होत असताना सरकार मात्र दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे राज्यात परिवर्तनाची गरज असल्याने परिवर्तन महाशक्तीची गरज आहे. सत्ता आणि विरोधामध्ये असल्या प्रस्थापितांच्या विरोधातली ही परिवर्तन महाशक्ती असल्याचे सांगत विषमता दूर करण्यासाठी आता मैदानात उतरलो असल्याचं नेत्यांनी सांगितले.

Maharashtra Politics: शिवसेना आणि राष्ट्रवादीत कोण खुर्द कोण बुद्रुक? पक्ष फुटीवर संभाजीराजे छत्रपतींचा सवाल
Maharashtra politics : महायुती, मविआनंतर राज्यात तिसरी आघाडी, बच्चू कडूंसह दिग्गज नेत्यांची बैठक!

परिवर्तन महाशक्तीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलतांना संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील पक्ष फुटीच्या राजकारणावर ताशेरे ओढले. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीला चांगेलच धारेवर धरलं. दोन काँग्रेस, दोन राष्ट्रवादी यामुळे मी गोंधळून गेलो. गाव दोन नावांचे असतात तसे कोण आहेत. राष्ट्रवादी खुर्द कोण आहेत ? राष्ट्रवादी बुद्रुक,कोण आहे? शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक तर हे का ?. जनतेच्या हितासाठी झाले का ? तुम्ही आमच्या आयुष्याचा खेळ केला, असा आरोप संभाजीराजे यांनी केला.

Maharashtra Politics: शिवसेना आणि राष्ट्रवादीत कोण खुर्द कोण बुद्रुक? पक्ष फुटीवर संभाजीराजे छत्रपतींचा सवाल
Assembly Election: मविआमध्ये तिढा, शरद पवार गट अन् समाजवादी पक्ष आमने-सामने, दोन्ही पक्षाचा एकाच वेळी २ जागांवर दावा!

आम्ही डॉर्क हॉर्स आहोत

या मेळाव्यात तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर टीका केली. राज्यात परिवर्तनाची गरज असल्याने परिवर्तन महाशक्तीची गरज आहे. सत्ता आणि विरोधामध्ये असल्या प्रस्थापितांच्या विरोधातली ही परिवर्तन महाशक्ती आहे. विषमता दूर करण्यासाठी मैदानात उतरलो असल्याचं सांगत नेत्यांनी दंड थोपटले आहेत.

निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त करतांना संभाजीराजे म्हणाले, आता ठोकाठाकी होणार. शर्यतीतील शेवटचे घोडे पुढे आले तर त्याला डार्क हॉर्स असे नाव दिले तसे आपण डार्क हॉर्स आहोत. आपण टुकटुकचां घोडा असून कसे मागून पुढे जाणार हे कळणार ही नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव कामापुरतं

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचे राजकारण केलं जाते. कामापूरते त्यांचे नाव वापरले जाते. माझं चॅलेंज आहेत की तुम्ही तुम्ही किल्ल्यासाठी किती पैसे दिले हे सांगा. ७५ वर्षात फक्त एक कोटी खर्च केला. फक्त राजकारणासाठी शिवाजी महाराजांचे नाव घेतलं जातं, असं म्हणत संभाजीराजे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीला टोला लगावला.

राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचां पुतळा बसवला. तेव्हा मी पंतप्रधान मोदींना पत्र लिहले होते, १२ डिसेंबर रोजी सांगितले की, योग्य पद्धतीने काम झाले नाही मात्र तेव्हा कुणी काही बोलले नाही. विरोधक ही शांत होते, असा आरोप संभाजीराजे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com