Maharashtra Politics: शिवसेनेच्या आमदाराने शिंदेंच्या विरोधातच दंड थोपटलं, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Satara Politics: मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या विधानामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.
Satara Politics:
साताऱ्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळला; आमदार महेश शिंदे यांची मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका.saam tv
Published On
Summary
  • साताऱ्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

  • आमदार महेश शिंदे यांची मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका

  • कार्यक्रमांना आमंत्रण न मिळाल्याची तक्रार

जिल्हा अध्यक्ष निवडणुकीवेळी धक्काबुक्कीमुळे चर्चेत आलेलं साताऱ्यातील राजकारण आता पुन्हा तापलंय. साताऱ्यातील शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना शिंदे गटातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आज प्रथमच जाहीर प्रतिक्रिया देत मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली आहे. शंभूराजे देसाई हे मला पहिल्यापासून वेगळी वागणूक देतात. कोणत्याच कार्यक्रमांना मला बोलावलं जात नाही, असा आरोप महेश शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला.

Satara Politics:
एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिवसेनेत राजीनाम्याचा 'लेटर बॉम्ब', बड्या नेत्याने साथ सोडली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपणास कार्यक्रमासाठी बोलावलेच नाही, फोनही आलेला नाही, असा दावाही शिंदे यांनी केला आहे. मला आमंत्रण नसल्याचा हा शिवसेनेचा पहिला कार्यक्रम नाही आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते तेव्हापासून माझे फोटो बॅनरवर नसतात, असे म्हणत महेश शिंदेंनी नाराजी व्यक्त केली. तर जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे, असा सवाल करत स्थानिक नेतृत्वालाही महेश शिंदेंनी टोला लगावला.

Satara Politics:
महापालिकेत तुफान राडा; शिवसेना-भाजप नगरसेवक एकमेकांवर धावले, परिसरात बंदोबस्त वाढवला|VIDEO

अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

जिल्हा परिषद निवडणुकीवर बोलताना शिंदे म्हणाले, माझी पत्नी शिवसेनेतून निवडून आली आणि भाजपकडून अध्यक्ष झाली नाहीये. आम्ही पहिल्यापासून भाजपसोबत काम करत आलो आहोत, असे स्पष्ट करत महेश शिंदे यांनी आपली राजकीय भूमिका मांडली. याचबरोबर ५ वर्ष पालकमंत्रीपद असूनही ३०सदस्यांपर्यंत पोहोचता आलं नाही, असा घणाघात करत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली. शिंदेंच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

कोण आहेत महेश शिंदे?

महेश शिंदे हे साताऱ्यातील कोरेगाव येथील शिवसेनेचे आमदार आहेत. जि.प.निवडणुकीत पत्नी प्रिया महेश शिंदे भाजपकडून विजयी झाल्या.

शिवसेनेशी विरोध घेत महेश शिंदेंनी प्रिया शिंदेंना निवडून आणले आहे.शिवसेनेचे दोन जि.प.सदस्यही महेश शिंदेंनी आपल्यासोबत नेले

शिवसेना-राष्ट्रवादीच्या ३५ जागा असूनही शिंदेंमुळं २७ जागांच्या भाजपचा अध्यक्ष विजयी झाला.

महेश शिंदेंची राष्ट्रवादीतून राजकीय कारकिर्द सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com