नागपूरमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी GEN - Z तरुणांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी एक सामान्य मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो, तसेच एक चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो, तर ही संविधानाची ताकद आहे. या वक्तव्यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी मोदी यांच्या बालपणीच्या ‘चहा विक्री’च्या कथित किस्स्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच “नरेंद्र मोदी गुजरातमध्ये चहा विकत होते, याचा पुरावा कुणी आणून दिला तर मी राजकारण सोडेन,” असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.
मोदी ज्या काळात गुजरातमध्ये चहा विकत असल्याचे सांगितले जाते, त्या काळात संबंधित रेल्वे स्थानक आणि प्लॅटफॉर्म अस्तित्वातच नव्हता, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे मोदींनी चहा नेमका कुठे विकला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मोदींच्या बालपणीच्या अनेक कथा सांगितल्या जात असून त्यातील चहा विक्रीची कथाही अशीच एक दंतकथा असल्याचा टोला राऊत यांनी लगावला. तसेच धर्माच्या नावावर समाजात तुकडे करण्याऐवजी महाराष्ट्राचे आभार मानावेत, असेही त्यांनी फडणवीसांना सुनावले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.