कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

Ratnagiri Political News: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगर परिषदेत सन्मानजनक जागा वाटप न झाल्याच्या कारणास्तवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक झाले आहेत. माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा दिला.
Maharashtra Politics: कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा
Devendra Fadnavis -Eknath Shindesaam tv
Published On

Summary -

  • कोकणात महायुतीत जागा वाटपावरून वाद निर्माण झाला

  • शिवसेनेच्या योगेश कदमांविरोधात भाजप आक्रमक

  • माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

  • भाजप पदाधिकाऱ्यांची देवेंद्र फडणवीस, चव्हाण आणि बावनकुळे यांना पाठवले नाराजीचे पत्र

अमोल कलये, रत्नागिरी

कोकणात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी उडाली आहे. शिवसेना आमदार योगेश कदम यांच्या विरोधात भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगर परिषदेत सन्मानजनक जागा वाटप न झाल्याच्या कारणास्तव भाजपच्या माजी आमदार, जिल्हाध्यक्षांसह ३९ पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनाम्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे यांना पत्र लिहून पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला.

Maharashtra Politics: कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा
Beed Politics : बीडमध्ये मुंडे भावाबहिणीची युती, परळी नगरपरिषद राखण्यात यश मिळणार का? VIDEO

शिवसेनेचे खेडचे आमदार योगेश कदम हे मीडिया समोर येऊन माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि वैभव खेडेकर यांच्याविरोधात अपमानजनक बोलत असल्याचा पत्रात आरोप करण्यात आला आहे. खेड नगरपरिषद स्वबळावर जिंकण्याची शक्यता असताना केवळ तीनच जागा मिळणे अत्यंत चुकीचे आहे असे मत भाजप नेत्यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्यासह बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पदाधिकाऱ्यांची तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या जागा वाटपामुळे पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे मत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Maharashtra Politics: कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा
Raigad Politics: महायुती तुटली; रायगडमधील राजकारण फिरलं,भाजप-राष्ट्रवादीचा शिंदेंना दे धक्का

केंद्रात आणि राज्यात सत्ता तुमची आणि भांडी घासा आमची असे म्हणत शिवसेनेच्या शिंदे गटाचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी गावागावात जाऊन हिणवतात असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पत्रात म्हटले आहे. खेड नगर परिषदेचे जागावाटप करताना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याची देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केली. शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी मीडियासमोर बोलणे तातडीने थांबवावे. जागावाटप न्याय आणि सन्मानजनक व्हावे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे मागणी केली. खेड नगर परिषदेमध्ये एकूण २० जागा आहेत. जागा वाटपामध्ये १७ जागा शिवसेना तर ३ जागा भाजपला असा महायुतीचा प्रस्ताव आहे

Maharashtra Politics: कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा
Nashik Politics: नाशिकमध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com