Political News : रवी राणांना मोठा धक्का! विश्वासू नेत्यानं साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; अमरावतीच्या राजकारणात खळबळ

Maharashtra Politcal News : अमरावतीत मोठी राजकीय घडामोड. रवी राणा यांचे विश्वासू कार्यकर्ते निलेश भेंडे यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
NILESH BHENDE JOINS SHIV SENA SHINDE FACTION, BIG SETBACK FOR RAVI RANA IN AMRAVATI
NILESH BHENDE JOINS SHIV SENA SHINDE FACTION, BIG SETBACK FOR RAVI RANA IN AMRAVATISaam Tv
Published On
Summary
  • निलेश भेंडे यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला

  • रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला मोठा धक्का

  • बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश

  • अमरावतीत नवीन राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता

अमर घटारे, अमरावती

Nilesh Bhende Joins Shiv Sena Shinde Faction Amravati Politics राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला मोठा धक्का बसला आहे. रवी राणा यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे श्री निलेश भेंडे यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा प्रवेश आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह पार पडला.या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

निलेश भेंडे हे गेल्या काही वर्षांपासून युवा स्वाभिमान पक्षात सक्रिय होते. त्यांनी विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेत अनेक आंदोलने केली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. रवी राणा (Ravi Rana News) यांच्यासाठी ते एक विश्वासू आणि प्रभावी कार्यकर्ते मानले जात होते. मात्र, त्यांच्या या अचानक झालेल्या निर्णयामुळे युवा स्वाभिमान पक्षात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर निलेश भेंडे (Nilesh Bhende Shivsena) यांनी नव्या उर्जेने काम करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या प्रवेशामुळे बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या गटाची स्थानिक पातळीवर ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे.

या घडामोडीमुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये (Vidhan Parishad Nivdnuk) रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. विशेषतः भेंडे यांच्या पाठोपाठ इतर कार्यकर्तेही पक्षांतर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, निलेश भेंडे यांच्या पक्षांतरामुळे अमरावतीच्या राजकारणात (Amravati Politics) नवे समीकरण तयार होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com