Praful Patel Statement: पक्ष आणि चिन्ह हे सगळं आमचंच, १० दिवसात पिक्चर क्लिअर होईल; प्रफुल्ल पटेलांची मोठी प्रतिक्रिया

Praful Patel Byte: येत्या १० दिवसात पिक्चर क्लिअर होईल. कायदेशीर कारवाईचा आमच्यावर कोणताही फरक पडणार नाही. आता आम्ही मागे वळून पाहणार नाही असे प्रफुल्ल पटेल.
Praful Patel Byte
Praful Patel Bytesaam tv
Published On

Praful Patel Latest Marathi News: राज्यात सोमवारी पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पक्षात मोठं बंड करत बहुसंख्य आमदारांना सोबत घेऊन युती सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेने राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे.

नुकतेच राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केलेले प्रफुल्ल पटेल हे देखील अजित पवारांसोबत गेले आहेत. त्यामुळे पक्षाला मोठं खिंडार पडल्याचं मानलं जात आहे. प्रफुल्ल पटेल यांनी आज यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आता मागे वळून पाहणार नाही, येत्या १० दिवसात पिक्चर क्लिअर होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Praful Patel Byte
Maharashtra Political Crisis Live Updates: ठाण्यात अजित पवार गटाचे समर्थक तरूण आक्रमक

आता आम्ही मागे वळून पाहणार नाही - प्रफुल्ल पटेल

प्रफुल्ल पटेल म्हणाले, "गुरुपोर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी आज मी शरद पवार यांना फोन करणार आहेत. येत्या १० दिवसात पिक्चर क्लिअर होईल. कायदेशीर कारवाईचा आमच्यावर कोणताही फरक पडणार नाही. आता आम्ही मागे वळून पाहणार नाही'

पक्ष आणि चिन्ह हे सगळं आमचंच - प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे सगळं आमचंच आहे, ते आमच्याकडेच राहणार आहे असा दावा देखील प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. गुरुपौर्णिमेला मी स्वतः शरद पवार यांना फोन करणार असून त्यांचे आशीर्वाद मागणार आहे. येत्या काही दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. (Breaking News)

Praful Patel Byte
Maharashtra Politics: अजित पवारांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलंय; बड्या नेत्याचा दावा, CM शिंदेंचं काय होणार?

शाखांवरून राष्ट्रवादीत जुंपण्याची शक्यता

दरम्यान आता राष्ट्रवादीतही दोन गट पडले असून पक्षाच्या शाखा आणि संविधानिक पदांवर दोन्ही गटांकडून दावा केला जात आहे. नागपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखेवर अजित पवार यांच्या गटाने दावा सांगितल्याचे वृत्त समोर आले आहे. (Latest Political News)

अनिल पाटील प्रतोदपदी कायम

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात फूट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड प्रतोदपती नियुक्ती केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाकडून पक्षाचे प्रतोद म्हणून अनिल पाटील हेच कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी एकच पक्ष असल्याने प्रतोद बदलण्याची गरज नाही अशी भूमिका घेत अजित पवार गटाकडून अनिल पाटील यांनाच प्रतोद पदी कायम ठेवण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com