Maharashtra Politics: वर्धापनदिनी शरद पवारांना मोठा झटका, विश्वासू सहकाऱ्यांनी सोडली साथ, भाजपमध्ये प्रवेश

NCP Sharad Pawar Group: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी शरद पवार यांना मोठा धक्का बसला. शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली आहे.
Maharashtra Politics: वर्धापनदिनी शरद पवारांना मोठा झटका, विश्वासू सहकाऱ्यांनी सोडली साथ, भाजपमध्ये प्रवेश
Sharad PawarSaam tv
Published On

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २६ वा वर्धापनदिन आहे. याच दिवशी शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली आहे. सत्यजितसिंह पाटणकर आणि वैभव पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत आज भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतले.

शरद पवार यांचे विश्वासू सहकारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर आणि खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. रविंद्र चव्हाण आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते.

Maharashtra Politics: वर्धापनदिनी शरद पवारांना मोठा झटका, विश्वासू सहकाऱ्यांनी सोडली साथ, भाजपमध्ये प्रवेश
Maharashtra Politics : नव्या चेहऱ्यांना संधी द्या; जयंत पाटलांच्या विधानावर रोहित पवार म्हणाले, माझी इच्छा नाही! VIDEO

यावेळी रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, '२०१९ आणि २०२४ ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभा उमेदवार असलेल्या सत्यजितसिंह पाटणकर आणि वैभव पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाटणकर आणि पाटील यांनी भाजपाला साथ दिली आहे. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचा यथोचित मान राखला जाईल.'

Maharashtra Politics: वर्धापनदिनी शरद पवारांना मोठा झटका, विश्वासू सहकाऱ्यांनी सोडली साथ, भाजपमध्ये प्रवेश
Maharashtra Politics: मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा, भरसभेत जयंत पाटील यांची शरद पवारांकडे मागणी

दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासोबत हिंदूराव पाटील, याज्ञसेन पाटणकर, राजाभाऊ शेलार, राजेश पवार यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला. पाटण तालुका दूधसंघ, अर्बन बँक आणि खरेदी विक्री संघाचे चेअरमन तसेच सर्व संचालकांनी तसेच सर्व आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, सर्व सदस्यांनी देखील कमळ हाती घेतले. पाटणनगर पंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचाही भाजपामध्ये प्रवेश झाला.

Maharashtra Politics: वर्धापनदिनी शरद पवारांना मोठा झटका, विश्वासू सहकाऱ्यांनी सोडली साथ, भाजपमध्ये प्रवेश
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात अंतर्गत धुसफूस, जिल्हाप्रमुख बदलण्याची मागणी तीव्र|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com