Maharashtra Politics : नव्या चेहऱ्यांना संधी द्या; जयंत पाटलांच्या विधानावर रोहित पवार म्हणाले, माझी इच्छा नाही! VIDEO

Maharashtra Politics : नव्या चेहऱ्यांना संधी द्या या जयंत पाटलांच्या विधानावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. मला प्रदेशाध्यक्ष व्हावंसं वाटत नाही. माझी इच्छाही नाही. मात्र पवार साहेब निर्णय घेतील, तो शेवटचा आदेश असतो असं रोहित पवार म्हणालेत.

मागील काही काळापासून जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जातील अशी चर्चा सुरू आहे. त्यात आता जयंत पाटील यांनी स्वतःच नव्या चेहऱ्यांना संधी द्या, असं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्यांच्या या विधानावर रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मला प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा नाही, असं सांगतानाच जयंत पाटील जे बोलले त्यावेळी आश्चर्य वाटलं, असं रोहित पवार म्हणाले. पवार साहेब निर्णय घेतील, तो शेवटचा आदेश असतो, असंही रोहित पवार म्हणाले.

जयंत पाटलांना वरच्या पदावर संधी द्या. आम्हाला पण जयंत पाटील बोलले त्यावेळेस आश्चर्य वाटलं. कार्यकर्ते, लोक भावुक होतात. जयंत पाटील यांना वरच्या पदावर काम करण्याची संधी द्यावी, प्रमुख नेते असताना आम्ही आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com