Ravindra Chavan News : नगरसेवक, आमदार ते मंत्री, आता थेट भाजप कार्याध्यक्ष; रविंद्र चव्हाण यांची Exclusive मुलाखत

Ravindra Chavan on Ministerial post : भाजपने नुकत्याच शिर्डीत घेतलेल्या अधिवेशनात कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी रविंद्र चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. त्यानंतर त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत

देशाच्या निवडणुकांच्या राजकारणातलं अत्यंत महत्वाचं ठरलेलं असं २०२४चं वर्ष नुकतंच संपलं आहे. २०२५ देखील आता महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे. कारण या वर्षात महापालिका, इतर स्वराज्य संस्था या सर्वांच्या निवडणुका या वर्षात होणं अपेक्षित आहे. अशावेळी निवडणुका म्हंटल्यावर भाजपचा वारू हा सर्वाधिक जोरात धावतो. भारतीय जनता पक्षाने एक निवडणूक संपून पूर्ण शंभर दिवसही होत नाहीत तोवर दुसऱ्या निवडणुकीची तयारी आता सुरू केलेली आहे. त्याच अनुषंगाने शिर्डीत भाजप नेतृत्वाने नुकतंच एक अधिवेशन देखील घेतलं आहे. कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त बळ देण्याचा हा प्रयत्न होता. यावेळी नवा कार्याध्यक्ष देखील निवडला. रवींद्र चव्हाण यांना ही कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आज साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट या खास कार्यक्रमात चव्हाण यांनी मुलाखत दिली आहे. येत्या काळात भाजप निवडणुकांसाठी कशाप्रकारची रणनिती आखत आहे, पक्षाची पुढची भूमिका काय असणार याबद्दल त्यांच्याशी केलेल्या बातचीतचा का व्हिडिओ..

प्रश्न : रविंद्र चव्हाण म्हटलं की भाजपशी नाळ जोडलेला एक नेता अशी ओळख आहे. तुम्हाला कार्याध्यक्ष पद द्याव याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही होते. याआधी तुमच्याकडे मंत्रीपद होतं. आता त्यानंतर मंत्रिपदावरून कार्याध्यक्षपद म्हणजे हे प्रमोशन आहे की डीमोशन?

रविंद्र चव्हाण : भाजपमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला संघटनात्मक पद चांगल्या पद्धतीने मिळावं यासाठी त्याची धडपड असते. त्यामुळे पक्षाच काम करायला सुरुवात केली तेव्हापासून नेहेमी असाच विचार केला की, संघटनात्मक कामात रुची असल्याने केंद्रीय नेतृत्वाने दिलेले नावीन्यपूर्ण कार्यक्रमामुळे पक्ष वाढीसाठी आणि विचारधारेमध्ये काम करणाऱ्या माझ्यासारख्या प्रत्येकाला संघटनात्मक कामात आनंद मिळत असतो. त्यामुळे मंत्रिपदापेक्षा संघटनात्मक जबाबदारी मोठी आहे.

प्रश्न : भाजपबद्दल असं बोललं जातं की, भाजप जेव्हा थोडं काढून घेतं तेव्हा भरभरून देतं, याबद्दल काय सांगाल?

रविंद्र चव्हाण : यात महत्वाचं हे आहे की, महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला पूर्ण बहुमत दिलं आहे. जे यापूर्वी कधीच मिळालं नव्हतं. सातत्याने तीन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या १०० पेक्षा जास्त जागा निवडून आल्या आहे. त्यामुळे सरकारकडून जनतेच्या फार अपेक्षा आहे. त्यामुळे सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी एकत्रपणे चालणं फार गरजेचं आहे. सरकारच्या योजना समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं हे संघटनेच्या कार्यकर्त्यांचं काम आहे. त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षात हे फार मोठ आव्हान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य सरकार ज्या प्रकारे नियोजन करत आहे, त्यातून महासत्तेकडे देश जावा यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत आहे. त्यासाठी ते धडपडत आहे.एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान चालत आहेत. त्यासाठी प्रत्येक राज्याला त्या दिशेने जाण्याचा मार्गही ते देत आहे. महाराष्ट्रानेसुद्धा त्याच प्रकारे उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यापासून प्रत्येक डिपार्टमेंट शंभर दिवसात काय करावं, त्यांच्याकडे काय आहे, काय नाही आहे याबद्दल सर्वांशी चर्चा करून एक उद्दिष्ट समोर ठेऊनच त्यांनी काम सुरू केलं आहे. हे सर्व करत असताना जनतेला काय अपेक्षित आहे हे सुद्धा पहाणं महत्वाचं आहे. हे संघटना म्हणून पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com