Supriya Sule News: 'आमच्या सारख्यांना न्याय मिळेल का? अशी शंका येते..' राष्ट्रवादी संघर्षाबद्दल सुप्रिया सुळेंचे मोठे विधान

Supriya Sule On NCP Crisis: धनंजय मुंडे इलेक्शन कमिशन झाले आहेत का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
Sharad Pawar, Supriya Sule, Ajit Pawar maharashtra Political News in Marathi
Sharad Pawar, Supriya Sule, Ajit Pawar maharashtra Political News in MarathiSaam TV
Published On: 

चेतन व्यास, प्रतिनिधी

Supriya Sule News:

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमधील संघर्ष वाढण्याची चिन्हे आता निर्माण झाली आहेत. अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून पक्ष आमचाच असल्याचा दावा केला जात आहे. याबाबतचा निर्णय आता निवडणूक आयोगाच्या कोर्टातही गेला आहे. निवडणूक आयोग नक्की कोणता निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठे विधान केले आहे.

Sharad Pawar, Supriya Sule, Ajit Pawar maharashtra Political News in Marathi
Hot Tea Spill On Girl: गरम चहा सांडल्याने चिमुकली भाजली; रुग्णालयात उपचार सुरू, पंचतारांकित हॉटेलमधील घटना

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे...

राष्ट्रपिता महात्मा गांधी (Gandhi Jayanti 2023) यांच्या जयंतीनिमित्त सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वर्ध्याच्या सेवाग्राम येथील बापुकुटी आश्रमाला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी "राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षात कोणतीही फूट पडली नसल्याचा पुनरुच्चार केला, तसेच आम्ही पक्षाच्या विचाराशी, गांधी, आंबेडकर, शाहू महाराजांच्या विचारांशी निष्ठावंत आहोत..." असेही त्या यावेळी म्हणाल्या.

यावेळी धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोग ६ तारखेला निर्णय देणार तेव्हा सर्व समजेल असे विधान केले होते. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी "धनंजय मुंडे इलेक्शन कमिशन झाले आहेत का? त्यांना काही वेगळी बातमी दिल्लीतील अदृश्य हाताने दिली आहे का? असा सवाल उपस्थित केला.

तसेच पुढे बोलताना "प्रफुल पटेल, धनंजय मुंडे जर निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दलची तारीख देत असतील, तर पेपर फुटला आहे आणि जर पेपर फुटला असेल तर आमच्यासारख्यांना न्याय मिळेल का?? अशी शंका येते" असे मोठे विधान त्यांनी यावेळी केले. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. (Latest Marathi News)

Sharad Pawar, Supriya Sule, Ajit Pawar maharashtra Political News in Marathi
PMPML Bus Service : पीएमपीएमएलच्या फेऱ्या वाढवा, मावळातील प्रवाशांची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.