
राज्यातील महायुतीचे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज नागपूरमध्ये होणार आहे. या शपथविधी सोहळ्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्री शपथ घेणार आहेत. नागपूरमधील राजभवनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. भाजपपाठोपाठ आता शिवसेनेचे जे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यांची नावं समोर आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे २१, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे १० मंत्री आज शपथ घेणार आहेत. शिवसेनेचे एकूण ११ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. हे सर्व आमदार नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सर्व आमदारांची नाव समोर आली आहेत. शिवसेनेकडून मंत्रिपदावर कोणाकोणाची वर्णी लागणार आहे हे आपण पाहणार आहोत..
शिवसेनेचे हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत -
१) उदय सामंत
२) शंभुराजे देसाई
३) गुलाबराव पाटील
४) दादा भुसे
५) संजय राठोड
६) संजय शिरसाट
७) भरतशेठ गोगावले
८) प्रकाश अबिटकर
९) योगेश कदम, कोकण
१०) आशिष जैस्वाल
११) प्रताप सरनाईक
दरम्यान, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला १६ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे.
शिवसेनेकडून दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपकडून विजयकुमार गावित, सुरेश खाडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे आणि धर्मरावबाबा आत्रम यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.