Maharashtra Politics: मनोज जरांगेंवर लक्ष्मण हाकेंचं टीकास्त्र; म्हणाले, 'मनोज जरांगेंची...'

Laxman Hake Criticized Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जहरी टीका केली आहे.
Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीवरून लक्ष्मण हाके संतापले; म्हणाले, 'मनोज जरांगेंची लायकी...'
Laxman Hake Criticized Manoj Jarange PatilSaam Tv
Published On

भरत नागणे, पंढरपूर

मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. सध्या राज्यातील सर्वच मतदारसंघामध्ये त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ते या निवडणुकीमध्ये सर्व मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांचे टेन्शन वाढले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जहरी टीका केली आहे. 'विधानसभा निवडणुका लढवण्याची मनोज जरांगेंची लायकी नाही.', असं विधान त्यांनी केले आहे.

लक्ष्मण हाकेंनी जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना सांगितले की, 'मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाचा मुद्दा कळलाच नाही. जरांगे हे निवडणुका लढू शकत नाहीत. त्यांची निवडणुका लढवाव्या इतकी हैसियत नाही. राजकारण आणि निवडणुका यांच्या बाहेर जरांगे यांना कुठलाही इंटरेस्ट नाही. त्यामुळे मनोज जरांगे हे निवडणुका लढवणार नाहीत.', असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीवरून लक्ष्मण हाके संतापले; म्हणाले, 'मनोज जरांगेंची लायकी...'
Maharashtra Politics: ...तर आमचा जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा, मराठा क्रांती ठोक मोर्चाने स्पष्ट केली भूमिका

लक्ष्मण हाके हे आज पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच,'येत्या निवडणुकीत ओबीसी प्रश्नाबाबत ज्या नेत्यांनी पक्षांनी ओबीसी प्रश्नावर भूमिका घेतली नाही. अशा नेत्यांच्या आमदारकीच्या वाटा ओबीसी लोकांच्या वाड्या वस्त्यावरून जातात. त्यामुळे ओबीसी प्रश्नावर न बोलणाऱ्या नेत्यांना या निवडणुकीत आम्ही घरी बसवू.' असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीवरून लक्ष्मण हाके संतापले; म्हणाले, 'मनोज जरांगेंची लायकी...'
Maharashtra Politics : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत; पडद्यामागे काय घडतंय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com