Balasaheb Thorat: विशाल पाटील यांना मदत केली, भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली; शिवसेनेची मागितली माफी

Balasaheb Thorat Big Statement Of Vishal Patil: सांगली विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेला बाळासाहेब थोरात यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी मोठं विधान केले.
Balasaheb Thorat: विशाल पाटील यांना मदत केली, भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली; शिवसेनेची मागितली माफी
Balasaheb Thorat Big Statement Of Vishal PatilSaam Tv
Published On

विजय पाटील, सांगली

'महाविकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चित आहे. मात्र मला महाविकास आघाडीतील कुणीही मुख्यमंत्री झाला तरी चालेल. महाविकास आघाडीमध्येच फक्त मुख्यमंत्री पदाची चर्चा होते. त्यामुळे महायुतीने विरोधी पक्षनेते पदाची आता चर्चा करावी.', असा महायुतीला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला आहे. ते सांगली विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते. प्रचार सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह शिवसेनेचे नेते देखील उपस्थित होते.

'पंतप्रधानानी राष्ट्रवादीतल्या एका पुढाऱ्याने ७० हजार कोटीचा घोटाळा केला असा आरोप केला होता. आज तो पुढारी महायुतीत सामील झाला आणि तिजोरीच्या चाव्या देखील त्या पुढाऱ्यांच्याच हातात दिल्यात. त्यामुळे भाजपवाल्याचे काय खरं नाही.' असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Balasaheb Thorat: विशाल पाटील यांना मदत केली, भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली; शिवसेनेची मागितली माफी
Maharashtra Politics : 'शपथविधीपूर्वीच्या बैठकीला पवार-अदानींचीही हजेरी'; पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट,VIDEO

सांगली पॅटर्नवर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, 'लोकसभेत आपल्या सगळ्याची मदत विशाल पाटील यांना झाली आहे. तर वसंतदादा याची पुण्याई ही झाली आहे. त्यामुळे विशाल पाटील खासदार म्हणून निवडून आले आहेत. स्टेजवर शिवसेनेचे नेते आहेत पण तुमची क्षमा मागतो.', असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी या सर्वांनी विशाल पाटील यांना या सगळ्यानी मदत केली असे जाहीरपणे सांगून टाकले.

Balasaheb Thorat: विशाल पाटील यांना मदत केली, भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली; शिवसेनेची मागितली माफी
Maharashtra Politics: राज ठाकरेंना उद्धव ठाकरे टाळी देणार? ठाकरे बंधुंना कोण करतंय दूर?

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेला जागा देण्यात आली होती. काँग्रेसकडून विशाल पाटील हे इच्छुक होते पण त्यांनी खूप प्रयत्न देखील केले. पण शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यांचा या मतदारसंघामध्ये विजय देखील झाला. विशाल पाटील सध्या सांगलीचे खासदार आहेत.

Balasaheb Thorat: विशाल पाटील यांना मदत केली, भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली; शिवसेनेची मागितली माफी
Maharashtra politics : बारामतीची सुभेदारी कोणाकडे? मुलीनंतर नातवासाठी पवारांची फिल्डिंग, उद्विग्न दादांचा काकांना सवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com