
Dhananjay Munde Resign : बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे गेल्या दोन महिन्यांपासून विरोधकांच्या टार्गेटवर आहेत. त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा सातत्यानं मागितला जात आहे. सरपंच हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचं CIDनं आरोपपत्रात म्हटलं आहे....तर कराड निकटवर्तीय असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली होती. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यातच आता अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे उद्या धनंजय मुंडे राजीनामा देणार असा खळबळजनक दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केलाय. करुणा मुंडेंच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
कराड अडकला, मुंडे गोत्यात?
- सरपंच हत्या प्रकरणाचा कराड मास्टरमाईंड, CIDचा आरोप
- कराड निटकवर्तीय असल्याची धनंजय मुंडेंचीच कबुली
- कराडला मुंडेंचा पाठबळ असल्याचा विरोधकांचा आरोप
- कराडांशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नसल्याचं पंकजा मुंडेंचं विधान
- कराड- मुंडेंच्या व्यावसायिक संबंधाचे दमानियांचे आरोप
दुसरीकडे विरोधकही धनंजय मुंडेंविरोधात चांगलाच आक्रमक झालेत. विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. तत्कालीन कृषीमंत्री असताना केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप आणि सरपंच हत्या प्रकरणात वाल्मीक कराडबरोबर सख्य असल्यानं अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे वादात सापडलेत. दुसरीकडे बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनाही नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.त्यामुळे राष्ट्रवादीच्या या दोन मंत्र्यांवरुन विरोधक अधिवेशनात सरकारवर तुटून पडणार हे निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.