विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इरेला पेटलेल्या समरजित घाटगे यांनी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 3 सप्टेंबर रोजी कागलमधील गैबी चौक येथे ते शरद पवार, सुप्रिया सुळे, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहे. मेळाव्यात कार्यकर्त्यांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेणार आहेत, यावेळी ते शक्तीप्रदर्शनही करण्याची शक्यता आहे, त्यामुळे महायुतीला हा मोठा धक्का मानला जात आहे. तसंच विद्यमान मंत्री आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या विधासभा निवडणुकीतील अडचणी वाढल्या आहेत.
उद्या कागल शाहू सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांची मतं आजमावून ते निर्णय घेणार आहेत. त्यांचा हा निर्णय येण्यापूर्वी समरजीत सिंह घाटगे यांच्या ट्विटर अकाउंट वरून भाजपचं कमळ चिन्ह गायब झालं होतं.तसंच महायुती सरकारच्या कोल्हापुरातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संमारंभालाही त्यांनी दांडी मारली होती. देवेंद्र फडणवीस या कार्यक्रात उपस्थित होते. तरीही घाटगे कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांचं पवार गटासोबत जाणं निश्चित मानलं जात होतं. त्यानंतर काही तासातंच ते 3 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षा पक्षप्रवेश करणार असल्याची बातमी आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे कागलमधील नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटर्तीय समरजितसिंह घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात विधासभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला होता. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याचा त्यांनी निर्धार केला होता. शरद पवार गटातून निवडणूक लढण्याच्या चर्चा असताना काल खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही निष्फळ ठरला होता. कारण आज कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमात घाटगेंनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी मारली.
जगातली सगळी ताकद तुमच्यासोबत आली तरी तुमच्या विरोधात निवडणूक लढवणारच, असा इशारा समरजित सिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला होता. त्यामुळे कागलमध्ये महायुतीत बंडाला सुरुवात झाल्याची चीन्ह पहायला मिळाली होती. समरजितसिंह घाटगे देवेंद्र फडणवीस यांचे निकवर्तीय मानले जातात, मात्र मुश्रीफ विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे ते अपक्ष किंवा शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्याची शक्यता होती. आता ३ तारखेला ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. कोल्हापूरच्या राजकारणात कागल महात्त्वाचा मतदारसंघ. त्यामुळे घाटगेंनी साथ सोडणं महायुतीसाठी अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.