Asia Richest Village : १२०० कुटुंबं, १७ बँका अन् ७००० कोटींच्या ठेवी; कसं आहे आशियातील सर्वात श्रीमंत गाव? एकदा बघाच

Asia Richest Village Madhapar : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील माधापार गाव आशियातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखलं जातं. या गावात १७ मोठ्या बँंका आणि या बँकामध्ये ७००० कोटींच्या ठेवी असून सर्व प्रकारच्या सुविधा गावात आहेत.
Asia Richest Village
Asia Richest VillageSaam Digital
Published On

भारत हा खेड्यांचा देश...पारंपरिक शेती आणि लहान सहान व्यवसायावर गुजराण करणारी ही खेडी काही अपवाद वगळता आजही आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहेत. काही गावांमध्ये मूलभूत सुविधाही नाहीत. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपल्याच देशात फर्स्ट क्लास सुविधा, राष्ट्रीयिकृत, आंतरराष्ट्रीय बँका, बँकांमध्ये हजारो कोटींच्या ठेवी, एकही कुटुंब गरीब तर सोडाच पण मध्यमवर्गीयही सापडणार नाही असं एखादं गाव असेलं तर... विश्वास बसणार नाही पण तुम्ही हे जे काही ऐकताय ते सर्व खरं आहे आणि हे गाव आल्याच देशात आहे.

Asia Richest Village
Maharashtra Politics : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या कोल्हापुरातील कार्यक्रमाला घाटगेंची दांडी; कागलमध्ये मुश्रीफ -घाटगे लढत अटळ?

हे गावं आहे गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील माधापार..आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून या गावाची ओळख आहे. या गावात एचडीएफसी, एसबीआय, पीएनबी, अॅक्सिस, आयसीआयसीआय , युनियन बँक आणि प्रमुख खासगी बँका मिळून १७ बँका आहेत. याच बँकांमध्ये तब्बल ७००० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. गुजरातमधील उद्योगधंद्यांमध्ये हातखंडा असलेल्या पटेल समुदायाचं हे संपूर्ण गाव आहे. २०११ मध्ये या गावाची लोकसंख्या १७००० होती, जी आता ३२००० वर पोहोचली आहे.

इतक्या लहान खेड्यात इतक्या बँका आहेत आणि अजूनही काही बँका या गावात शाखा सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. यावरून या गावच्या श्रीमंतीचा आणि वैभवाचा अंदाज येऊ शकतो. माधापारच्या समृद्धीमागे येथील एनआरआय (नॉन-रेसिडेंट इंडियन) कुटुंबांचा मोठा वाटा आहे. ही कुटुंबं दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्कम स्थानिक बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये जमा करतात. गावात जवळपास २०,००० घरे आहेत आणि सुमारे १,२०० कुटुंबं विदेशात राहतात, विशेषतः आफ्रिकन देशांमध्ये. व्यापारामध्ये पटेल समुदायाचं जगभरात मोठं नावं आहे. मध्य आफ्रिकेतही बांधकाम उद्योगात गुजराती पटेल समुदायाचं मोठं वर्चस्व आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि न्यूझीलंडमध्येही पटेल समुदाय मोठ्या संख्येने आहेत. त्यांत या गावातील कुटुंबांचाही समावेश आहे.

Asia Richest Village
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकांआधीच मविआत CM पदावरून रस्सीखेच ; शरद पवार गटातील या नेत्याच्या नावाची चर्चा

विदेशात राहणाऱ्या पटेल समुदायाच्या या कुटुंबांनी माधापारशी आपले संबंध कायम ठेवले आहेत....आणि विदेशात व्यवसाय, नोकरी करत असले तरी आपल्या देशातील बँकांमध्येच पैसे ठेवणं पसंत करतात. माधापारच्या समृद्धीचं वर्णन करताना जिल्हा पंचायतच्या माजी अध्यक्ष पारुलबेन अजिबात थकत नाहीत, त्या सांगतात, की या गावातील आर्थिक स्थैर्य हे मुख्यतः या मोठ्या ठेवींचे फळ आहे. गावात पाणी, स्वच्छता, रस्ते यांसारख्या मूलभूत सोयीसुविधा उत्तम आहेत. गावात सगळीकडे बंगलेच दिसतील, शाळा, तलाव, आणि मंदिरांसह अनेक सुविधा आहेत.

माधापारमध्ये सनातन ठाकूर मंदिर, महादेव मंदिर, बरला मंदिर, १९४९ मध्ये स्थापन केलेलं स्वामीनारायण मंदिर , यक्ष मंदिर किंवा जाख बौतरा मंदिर आहे, 72 यक्ष किंवा जख बोटेरा देवतांचे स्थान आहे.माधापारजवळ गुजरातमधील मोठं शहर पोरबंदर आहे. अशा या माधापारला भारतातील प्रत्येक गावातील नागरिकांनी एकादातरी भेट देण्याची गरज आहे.

Asia Richest Village
Pune Court News: लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषीला या जिल्ह्यात सुनावली आहे फाशीची शिक्षा; ७ वर्षांच्या मूलीवर केला होता अत्याचार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com