शिंदे-शहांची भेट होऊनही राजकीय लढाई सुरु, २४ तासांत शिवसेनेनं भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार फोडला

Eknath Shinde Amit Shah Meeting Fails To Cool Tensions: दिल्लीतील अमित शाह–शिंदे भेटीनंतर अवघ्या 24 तासांत हिंगोलीत शिंदेसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला. भास्कर बांगर यांनी माघार घेत शिवसेनेत प्रवेश केल्याने महायुतीतील कलह पुन्हा ठळक झाला आहे.
Bhaskar Bangar quits the BJP’s Hingoli civic poll race and joins Shiv Sena in the presence of MLA Santosh Bangar, intensifying the Shinde Sena–BJP political clash.
Bhaskar Bangar quits the BJP’s Hingoli civic poll race and joins Shiv Sena in the presence of MLA Santosh Bangar, intensifying the Shinde Sena–BJP political clash.Saam Tv
Published On

शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीनाट्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत भाजप आणि शिंदे गटातील कलह समोर मांडला. भाजप शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील पदाधिकारी आणि नेते आपल्या पक्षात घेत असल्याचा आरोप शिंदेसेनेने केला होता. ठाणे, कल्याण, डोंबिवली, कोकण, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी असा प्रकार सुरू असल्याने शिंदेसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी होती.

Bhaskar Bangar quits the BJP’s Hingoli civic poll race and joins Shiv Sena in the presence of MLA Santosh Bangar, intensifying the Shinde Sena–BJP political clash.
Maharashtra Politics: निष्ठावान राहिलो ही आमची चूक होती का? पक्षातून हकालपट्टी होताच शिवसेना नेते ढसाढसा रडले

त्यानंतर शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. तसेच शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी फडणवीसांची भेट घेत भाजप प्रवेशावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र यावर फडणवीस म्हणाले होते की, पक्ष प्रवेशाची सुरुवात तुम्ही उल्हासनगरमधून केली होती. तुम्ही करणार ते चालणार आणि आम्ही गप्प बसणार हे होणार नाही अशा कठोर शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना खडेबोल सुनावले होते.

Bhaskar Bangar quits the BJP’s Hingoli civic poll race and joins Shiv Sena in the presence of MLA Santosh Bangar, intensifying the Shinde Sena–BJP political clash.
Accident News : पुण्यातून कोकणात निघाले, वाटेत काळाने गाठलं, ताम्हणी घाटात चौघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या तक्रारीला 24 तासांचा कालावधी उलटला नसताना हिंगोलीमध्ये शिंदेगटाने चक्क भाजपकडून नगरपरिषद निवडणुकीच्या मैदानात उभ्या असलेल्या उमेदवाराला फोडत माघार घ्यायला लावली आहे. हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक 16 ब मधील उमेदवार भास्कर रंगनाथ बांगर यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेत शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत देखील प्रवेश केला आहे.

Bhaskar Bangar quits the BJP’s Hingoli civic poll race and joins Shiv Sena in the presence of MLA Santosh Bangar, intensifying the Shinde Sena–BJP political clash.
Maharashtra Politics: भाजपनंतर राष्ट्रवादीकडून आरोपीला उमेदवारी, तुरूंगातून लढवणार नगराध्यपदाची निवडणूक

भास्कर बांगर यांच्या माघारीने शिवसेनेचे उमेदवार श्याम अंबादास कदम यांची निवडणूक सोपी झाली आहे. तर या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार पुढे उभा असल्याने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्या प्रकारानंतर आता हिंगोलीत भाजपचे नेते शिवसेनेच्या विरोधात आक्रमक झाले असून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचं आमदार तानाजी मुटकुळे म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com