ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काकांना मोठा धक्का, पुतण्याचा थेट भाजपमध्ये प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

NCP Sharad Pawar Faction Setback: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे राहुल शेलार यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Rahul Shelar along with BJP leaders during his official induction into the Bharatiya Janata Party in Nashik.
Rahul Shelar along with BJP leaders during his official induction into the Bharatiya Janata Party in Nashik.Saam Tv
Published On

नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाला शेलार यांचे पुतणे राहुल शेलार यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

Rahul Shelar along with BJP leaders during his official induction into the Bharatiya Janata Party in Nashik.
वारं फिरलं, भाजप आणि शिंदेसेनेला काँग्रेसचा पॉवरफूल दणका, 35 वर्ष काम केलेल्या शेकडो निष्ठावंताचा राजीनामा

राहुल शेलार यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Rahul Shelar along with BJP leaders during his official induction into the Bharatiya Janata Party in Nashik.
Local Body Election: पालिका निवडणुकीत भाजप नंबर १ चा पक्ष कसा ठरला, कुणाला क्रेडिट आणि कसा होता प्लान?

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. यावेळी भाजपने आगामी निवडणुकांमध्ये नाशिकमध्ये ताकद वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गजानन शेलार शरद पवार गटाचे अत्यंत निष्ठावंत आणि मागच्या अनेक वर्षांपासून ते नगरसेवक म्हणून निवडून येतात.

Rahul Shelar along with BJP leaders during his official induction into the Bharatiya Janata Party in Nashik.
Ajit Pawar : अजित पवारांनाही तिढे सुटेना; पुण्यातील प्रभाग क्रमांक ३८ चा असा कुठला गुंता आहे?

आगामी महापालिकेच्या महापौरपदाचे गजानन शेलार हे संभाव्य उमेदवार असल्याचे देखील बोलले जात आहे. अशातच आता त्यांच्या पुतण्याने पक्षांतर केल्याने शेलार कुटुंबात राजकीय फुट पडल्याचे दिसून येत आहे.राहुल शेलार हे गजानन शेलार यांच्या प्रभागातील कामे बघतात. लोकांशी त्यांचा थेट संबंध असल्याने त्यांना प्रभागातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा जनतेला दिलाय.

यावेळी माध्यमांशी संवाद साधत ते म्हणाले, जुन्या नाशिकमध्ये अनेक प्रश्न आहे. ते सोडवण्यासाठी गजानन शेलार यांनी प्रयत्न केले पण जनतेची मनस्वी भावना होती, की आपण भाजपमध्ये जावे आणि विकासाला प्राधान्य देत आपल्या प्रभागाचा विकास करावा असे राहुल शेलार म्हणाले. अशातच येणाऱ्या निवडणुकीत जुन्या नाशिकमध्ये काका पुतणे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो का? की गजानन शेलार स्वतः कमळ हाती घेतात का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

या पक्षप्रवेशावेळी भाजपचे शहर अध्यक्ष सुनील केदार, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com