Maharashtra Politics: भाजपमध्ये प्रवेश करणार का? अजित पवारांच्या बड्या नेत्याने एका वाक्यात विषय संपवला

Dilip Mohite Patil On BJP: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सरू होत्या. पण त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या चर्चांना पूर्णविराम दिले. मी कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Maharashtra Politics: भाजपमध्ये प्रवेश करणार का? अजित पवारांच्या बड्या नेत्याने एका वाक्यात विषय संपवला
Dilip Mohite Patil Saam TV
Published On

Summary -

  • दिलीप मोहिते पाटील यांच्याबाबत भाजप प्रवेशाची चर्चा

  • त्यांनी स्वतः अफवांना पूर्णविराम दिला

  • पक्षनिष्ठा कायम ठेवण्याचे मत त्यांनी व्यक्त केले

रोहिदास गाडगे, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक दिलीप मोहिते पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. दिलीप मोहिते पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेतल्यापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. अखेर या चर्चांना दिलीप मोहिते पाटील यांनी पूर्णविराम दिले आहे. 'पक्षनिष्ठा अबाधित. भाजपात जाण्याचा प्रश्नच नाही.', असे म्हणत दिलीप मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीतच कायम राहणर असल्याचे सांगितले.

भाजप नेते रविंद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप मोहिते पाटील यांची पुन्हा भेट झाली होती. या भेटीनंतर मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या सर्व चर्चांनंतर मोहिते पाटील यांनी माध्यमांशी बोलताना 'मी आहे त्या ठिकाणी सुखी आहे. दुसऱ्या कुठल्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही. पक्षाला धोका देण्याचा प्रश्नच नाही.' असं ठाम विधान करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Maharashtra Politics: भाजपमध्ये प्रवेश करणार का? अजित पवारांच्या बड्या नेत्याने एका वाक्यात विषय संपवला
Maharashtra Politics: कोकणात ठाकरेसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ; 'धनुष्यबाण' घेणार हाती

यावेळी त्यांनी 'अशी वेळ आली तर राजकारणातून संन्यास घेईन. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं कृत्य करणार नाही.' असे ठामपणे सांगितले. रविंद्र चव्हाण यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. मात्र या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी दिलेल्या या स्पष्टिकरणामुळे चर्चांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Politics: भाजपमध्ये प्रवेश करणार का? अजित पवारांच्या बड्या नेत्याने एका वाक्यात विषय संपवला
Maharashtra Politics: शेवटी भाजपनं डाव साधला; अजित पवारांचा कट्टर समर्थक फोडला, राष्ट्रवादीचा आमदार हाती घेणार कमळ?

दरम्यान, अजित पवारांचे विश्वासू आणि खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप मोहेत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. संजय जगताप यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीमुळे मोहिते पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. दिलीप मोहिते पाटील हे पक्ष निर्णयात विश्वासात घेतलं जात नसल्यानं नाराज असल्याचे चर्चा होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात होते.

Maharashtra Politics: भाजपमध्ये प्रवेश करणार का? अजित पवारांच्या बड्या नेत्याने एका वाक्यात विषय संपवला
Maharashtra Politics: शिंदेंच्या शिवसेनेत मोठा उलटफेर होणार; अनेकांचा पत्ता होणार कट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com