Devendra Fadnavis Statement: मी पुन्हा येईन सांगितलं की येतोच; वेगवान राजकीय घडामोडींदरम्यान फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis - Mi Punha Yein: देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याने चर्चला उधाण
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam TV

रणजीत माजगावकर

Devendra Fadnavis Big Statement: मी पुन्हा येईन असं सांगितल्यानंतर मी पुन्हा येतोच असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलय. बेळगाव जिल्ह्यामध्ये प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे सीमा भागात प्रचार करत आहेत.

बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमा भागात असलेल्या निटूर इथल्या नृसिंह जयंती आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने फडणवीस यांनी मी पुन्हा येईन संदर्भात वक्तव्य केलय. मी एकदा पुन्हा येईन असं सांगितल्यानंतर मी पुन्हा कसा येतो हे तुम्ही बघितलाच आहात असं वक्तव्य फडणवीस यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चला उधाण आले आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis
NCP new President: राष्ट्रवादीला अध्यक्षपदासाठी नवा चेहरा मिळणार? शरद पवारांच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष

मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच

बेळगाव दौरा करुन कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे वक्तव्य केलं. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो. देवेंद्र फडणवीस यांचे चंदगडमधील निट्टूर गावात हे वक्तव्य केले. सीमाभागात दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी नरसिंह मंदिराला अचानक भेट दिली. (Political News)

Devendra Fadnavis
Badrinath landslide: बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळून मोठी दुर्घटना; एकाचा दुर्दैवी मृत्यू

राज्यात सत्तापालट होणार का?

एकीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मी एकदा पुन्हा येईन असं सांगितल्यानंतर मी पुन्हा येतोच असे विधान केले आहे. त्यामुळे राज्यात सत्तापालट होणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com