Maratha Reservation: मराठ्यांना फसवलं की ओबीसींना? आरक्षणाच्या निर्णयानंतर काँग्रेसचा राज्य सरकारला सवाल

Nana Patole News: मनोज जरांगे यांचे उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री जातात मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का जात नाहीत असे म्हणत, अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
Nana Patole
Nana Patole SAAM TV
Published On

Nana Patole On Maratha Reservation:

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयावरुन भाजपवर निशाणा साधत मराठा आरक्षणाच्या संदर्भात निकाल देताना राज्य सरकारने नेमकं मराठ्यांना फसवलं की ओबीसींना फसवलं हेच कळायला मार्ग नाही, असा टोला लगावला आहे. तसेच मनोज जरांगे यांचे उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री जातात मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का जात नाहीत असे म्हणत, अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

"आरक्षण देताना ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देऊ असे सांगितले होते मग आरक्षण नेमके कसे दिले याचा खुलासा राज्य सरकारने करावा, त्याचबरोबर सरसकट आरक्षण देऊ असे सांगितले होते मात्र ते का दिले नाही असे म्हणत नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले की ओबीसी समाजाला याचा खुलासा करावा," अशी मागणी सरकारकडे केली आहे.

"जनगणना करण्याची मागणी सुरुवातीपासून आहे. एक फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात 50 टक्क्यांची मर्यादा तोडून सगळ्यांना न्याय द्यावा तसेच सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्यावे ही आमची सुरुवातीपासून मागणी असून, यांनी नक्की कोणाला फसवले? याबाबतचा संभ्रम राज्यात कायम असल्याचं मत देखील नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nana Patole
Amravati Breaking News: धक्कादायक! मोर्शीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची तहसील कार्यालयात आत्महत्या, राज्यभरात खळबळ

"मराठा समाजाच्या आरक्षणाची ही लढाई आज झालेली नसून या आधी चार वेळा झाली आहे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जे सांगितले तेच आता पुन्हा दिले आहे, यामुळे यांनी नक्की कुणाला फसवले याबाबत स्पष्टीकरण द्यावे, तसेच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना संपवण्याचे काम भाजप सरकार करीत असून ते काँग्रेस खपवून घेणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला आहे. (Latest Marathi News)

Nana Patole
Maratha Reservation: ही तर सरळसरळ मराठा समाजाची फसवणूक; अध्यादेशावरून एकनाथ खडसेंचा सरकारवर निशाणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com