मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर मोठे यश आले असून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. सरकारी अध्यादेश हातात पडल्यानंतर राज्यभरात मराठा बांधवांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला जात आहे. या निर्णयानंतर मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार हल्लाबोल करत पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
काय म्हणालेत सदावर्ते?
"मनोज जरांगेंचे (Manoj jarange Patil) आंदोलन का एक स्टंट आहे. जरांगेंचा अभ्यास काय? ते कोणत्या कॉलेजमधून लॉ पास झालेत, कोणत्या विषयात डॉक्टरेट केली आहे. मराठ्यांना ईडब्लूएसपासून वंचित ठेवण्यासाठी हे आंदोलन होतं. या आरक्षणाला कायद्यातून तरतूद नाही. कायद्यात कुठलीही अशी बॅक डोअर एन्ट्री नाही, असे म्हणत लवकरच न्यायालयाचे दार ठोठावणार," असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
रोहित पवार- राऊतांवर टीकास्त्र...
"रोहित पवार (Rohit Pawar) ही आझाद मैदानात गेले होते. हा रोहित पवार संजय राऊतांचा राजकीय स्टंट आहे. अशा लोकांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही. मराठा बांधवांनी आपली एनर्जी वाया घालू नये. कायदा वाचावं, कलमं पाहावी. अध्यादेशाने हुरळून जाण्यात काही अर्थ नाही, अध्यादेशाचा नीट अभ्यास करावा," असेही सदावर्ते यावेळी म्हणाले.
सोमवारची वाट बघा..
दरम्यान, "ओपन आणि ओबीसी आरक्षणातील जागा कमी होऊ देणार नाही. मागच्या दाराने आरक्षण घेण्याची कोणतीही तरतूद नाही. मागासवर्गांचे रक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे. सरकारला कायदा मानावाच लागेल, लोकांना घरी जाऊ द्या, सोमवारची वाट बघा," असे सूचक विधानही त्यांनी केले. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.