Manoj Jarange Family
Manoj Jarange FamilySaam TV

Manoj Jarange Family: जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश; वाचा कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया

Manoj Jarange Patil Family First Reaction: आरक्षणामुळे शिक्षणात मला याचा फार फायदा होणार आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळाल्यामुळे कमी फीमध्ये महाविद्यालयात आणि शाळांत प्रवेश मिळेल, असंही पल्लावी यावेळी म्हणाली.
Published on

लक्ष्मण सोळुंके

Maratha Aarakshan:

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या ५ महिन्यांपासून लढा देत आहेत. आज त्यांचा हा लढा अखेर पूर्ण झालाय. आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्याने आणि जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याने सर्वत्र मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केलाय. या सर्वांवर मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबीयांनी देखील आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आनंद शब्दांत सांगणं कठीण

मराठा आरक्षण मिळाल्याने मला फार आनंद झाला आहे. हा आनंद शब्दांत सांगणं कठीण आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावर सकारात्मक गोष्टी घडत होत्या, त्यामुळे आरक्षण मिळेलच असं मला आधिपासून वाटत होतं, अशी प्रतिक्रिया जरांगेंची मुलगी पल्लवीने दिली आहे.

आरक्षणामुळे शिक्षणात मला याचा फार फायदा होणार आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळाल्यामुळे कमी फीमध्ये महाविद्यालयात आणि शाळांत प्रवेश मिळेल, असंही पल्लावी यावेळी म्हणाली.

मनोज जरांगे यांच्या पत्नीने देखील माध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्यात. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं की, साडेपाच महिने झाले ते घरी आले नाहीत. मात्र आता ते घरी येतील. आरक्षणासाठी ज्यांनी बलीदान दिलं त्यांचा या विजयात मोठा वाटा आहे. आज आम्हाला फार आनंद झालाय.

मराठ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदे देव

मराठा समाजाला आरक्षण मिळेलच अशी, शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. त्याची आठवण मनोज जरांगे यांच्या वडिलांनी यावेळी करून दिली आहे. मला या गोष्टीचा आनंद होत आहे. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यांनी ती पूर्ण केली. त्यामुळे मराठ्यांसाठी मुख्यमंत्री देव झाले आहेत. त्यांचे आम्ही फार आभारी आहोत, असं जरांगेंच्या वडिलांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange Family
Maratha Reservation News : पालकमंत्री Deepak Kesarkar आणि मंगल प्रभात लोढा जरांगेच्या भेटीला!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com